पुण्याच्या प्रवाश्याचा मोबाईल चोरीस
सोलापूर – गावी जाण्यासाठी बस स्थानकावर आलेल्या एका प्रवाशाच्या खिशातील मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना सोलापूर एसटी बस स्थानकावर गुरुवारी दुपारी घडली . दरम्यान या प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत वसंत इस्माईल कांबळे ( रा-बी/४ प्लॉट नं ३०१ , आनंदग्राम सोसायटी , पुणे ) यांनी फिर्याद दिली आहे .
यातीत फिर्यादी हा गुरुवारी दुपारी एस.टी. स्टॅन्ड वर उभा असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या खिश्यातील १५ हजार रुपये किमतीचा पिस्ता रंगाचा विवो लाईट मोबाईल फिर्यादीच्या नकळत चोरून नेण्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार भद्रशेट्टी हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहे .
आमचे काम का सोडले म्हणून तरुणास लाकडाने मारून जीवे मारण्याची धमकी – दोघांवर गुन्हा दाखल
सोलापूर – आमचे काम का सोडले म्हणून एका तरुणास लाकडाने मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी विजापूर नाका पोलीस ठाण्यात दोघांवर गुन्हा दाखल करण्यात
आला .
पप्पु पुर्ण नाव माहित नाही आणि एक अज्ञात व्यक्ती ( रा माहित नाही ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून याबाबत अनिल रामविलास कुमार ( रा अत्तार नगर सोलापूर ) यांनी फिर्याद दिली आहे .
वरील आरोपींनी यातील फिर्यादीला दि २७ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अत्तार नगर येथे बोलावून घेतले व आमचे काम का सोडले म्हणून लाकडी काठीने पाठीवर , पायावर मारून जखमी केले व तुला सोडत नाही अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार गायकवाड हे गुन्ह्याचा पुढील तपास करीत आहेत .
Post Views: 10