पंढरपूर – येथील उपविभागीयपोलिस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने २९ जुन २०२६ रोजी शहरातील इसबावी भागातधाडी टाकून दोन अवैध दारु धंद्यावर कारवाई करीत सुमारे २७ हजार रुपयांचा मुद्देमालजप्त केला. या प्रकरणी दोन महिला आणि एक इसमाला ताब्यात घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आली.
या कारवाईची पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांना पंढरपूर शहरातील इसबावी भागात वेगवेगळया दोन ठिकाणी काही इसम अवैधपणे देशीविदेशी दारूची विक्री करत असल्याची गोपनीय बातमी मिळाली.
त्या नुसार प्रशांत डगळे हे स्वतः व त्यांच्या कार्यालयाकडील पोलीस पथकासह इसबावी भागात शिंदे चौक व सहयाद्री नगर येथे गेले असता, शिंदे चौक इसबावी येथे दिपाबाई ज्ञानेश्वर काळे ही महिला तिच्या राहते घराचे बाजूला निळ्या रंगाच्या प्लॉस्टिक बॅरलमध्ये १०० लि. हातभटटी दारू विक्री करीत असल्याचे दिसून आली. यावेळी पथकातील पोलिसांनी तिस गराडा घालून पकडले असता तिचे ताब्यात १० हजाररुपये किंमतीची हातभट्टीदारू मिळून आली. त्यानंतर इसबावी भागातीलच सहयाद्री नगर येथे पञ्याचे खोली शेजारी आडोशाला १५ ते २० इसम दारू पिताना दिसून आली. त्या ठिकाणी शोभा गणेश देशमुख ही महिला तिच्या घराचे समोर पांढऱ्या रंगाच्या पिशव्यात देशी विदेशी दारूच्या बाटल्या घेवून विक्री करीत होती. त्यावेळी पोलीस पथकाने तिला पकडून तिचे ताब्यात देशी विदेशी दारूंचा १७ हजार २० रूपये किंमतीचा माल मिळून आला. या महिलेकडे पोलिसांनी चौकशी केली असता देशी विदेशी दारूंची खरेदी व विक्री तिचा पती गणेश सुनिल देशमुख हे करीत असल्याचे तिने सांगितले.
दरम्यान या दोन्ही ठिकाणी पोलिसांना२७ हजार २० रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळून आले. या बरोबरच पोलिसांच्या या कारवाई मध्ये दिपाबाई ज्ञानेश्वर काळे (रा.शिंदेचौक इसबावी) व शोभा गणेश देशमुख व गणेश सुनिल देशमुख यांना जेरबंद करुन त्यांच्या विरूध्द पंढरपूर शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांकडून देण्यात आली.
दरम्यान ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत डगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ हेंबाडे, मपोहेकॉ राऊत, पोना शिंदे, पोना चव्हाण, पोकॉ माने, पोकॉ घायाळ, पोकॉ लोंढे, पोकों हुलजंती यांनी पार पाडली.
—————–
चौकट ( पोलिसांकडून करण्यात
आले आवाहन )
येथील उपविभागीय पोलिस अधिका
री प्रशांत डगळे यांनीपंढरपूर शहर व तालुक्यातील जनतेला आवाहन केले आहे की, आपल्यागावामध्ये अशा प्रकारचे अवैध धंदे चालु असल्यास आम्हास संपर्क करावा व यापुढे कोणीअशा प्रकारचे बेकादेशीर कृत्य अथवा अवैध धंदे सुरू ठेवील अशा समाजविघातक लोकांवरप्रचलित कायदयानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची यापुढे कोणतीही गयकेली जाणार नाही असे देखील शहर आणि तालुक्यातीलनागरिकांना उपविभागीय पोलिस अधिकारी डगळे यांनी आवाहन केले आहे.
Post Views: 7