सांगोला – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती सांगोल्यात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित व्याख्यानात डी.जी.देशपांडे यांनी ‘सावरकर-जीवन, कार्य आणि प्रेरणा’ या विषयावर मार्गदर्शन करताना स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे राष्ट्रप्रेम, अंदमानातील अमानुष छळाला सामोरे जाण्याचे अद्वितीय धैर्य आणि त्यांनी दिलेला विज्ञानाचा संदेश आजच्या तरुण पिढीसाठी अत्यंत प्रेरक व मार्गदर्शक असल्याचे स्पष्ट केले. याप्रसंगी इ.१० व १२ वीच्या परीक्षेत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार जि.प.शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, गट विकास अधिकारी उमेशचंद्र कुलकर्णी यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी शिवाजीराव गायकवाड, नगरसेविका आशादेवी यावलकर, उत्सव समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर कुलकर्णी, उपाध्यक्ष श्रीनाथ बीडीकर, खजिनदार निलेश ताकभाते, प्रसिद्धी प्रमुख डॉ.मानस कमलापुरकर, नागेश जोशी, श्रीकांत देशपांडे, श्रीकांत हसबनीस, कौस्तुभ भोसेकर, संजय हसबनीस, गणेश देशपांडे, मंगेश कुलकर्णी, श्रीनिवास देशपांडे, ऍड.विशाल बेले, ऍड.सारंग वांगीकर, सचिन बेले, ओंकार कुलकर्णी, तेजस कुलकर्णी, कुमार कुलकर्णी, रवी कुलकर्णी, अनिल कुलकर्णी, समर्थ देशपांडे, मंथन बेले, शेखर देशपांडे, सचिन देशपांडे, उदय पुजारी, सुदीप बेले अनिल देशपांडे, प्रा.राजेंद्र ठोंबरे, प्रा.भगवंत कुलकर्णी, केदार जोशी, श्रीहरी कुलकर्णी, अनिता बेले, सुमेधा वांगीकर, सानिका जोशी, रेणुका लहुळकर, नम्रता जोशी, वैशाली बेले, शेंडेकर, अक्षय बाबर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाला नागरिक, सावरकर प्रेमी, शिक्षक, पालक, विद्यार्थी उपस्थित होते.