
जेऊर – उमरड (ता.करमाळा) येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. गावातील पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी मान्यवर मंडळींनी अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास उपस्थित लोकांना सांगितला. यावेळी प्रा.नंदकिशोर वलटे यांनी लोकमाता अहिल्यादेवी खऱ्या अर्थाने जातिभेद निर्मोलन करणाऱ्या द्रष्ट्या समाजसुधारक होत्या असे सांगितले.भारतीय प्रशासन सेवेत कार्यरत असलेले पांडुरंग चोरमले यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर राहण्यासाठी तरुणांना पन्नस हजार रुपयांची देणगी जाहीर केली व मा.सभापती अतुल पाटील यांनी गावातील युवकांनी जयंती निमित्ताने समाजसुधारणेचे कार्य करावे असे मत मांडले. आदिनाथ कारखान्याचे संचालक राजाभाऊ कदम यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या इतिहास सर्व महिलांनी अंगिकरवा व बेडरपणे अनिष्ट प्रथावर हला चढवावा असे आवाहन केले या कार्यक्रमास मकाई कारखान्याचे संचालक बापूराव चोरमले, आदिनाथ कारखान्याचे संचालक श्रीमान चौधरी, सरपंच प्रमोद बदे,मा. सरपंच संदिप मारकड,मा.सरपंच दादा पाटील, उदयसिंह पाटील,बालाजी पाटील,पोलीस पाटील अंकुश कोठावळे,जनार्धन मारकड,श्रीकांत,मारकड बंडगर डॉक्टर,रसूल शेख,ज्ञानेश्वर मारकड,विशाल मारकड,बिरुदेव हुलगे,दादा मारकड,साईदिप मारकड,इत्यादी मान्यवर उपस्थित होते..या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन फोजमल पाखरे गुरुजी यांनी केले.