सोलापूर – अज्ञात कारणावरून एका 34 वर्षीय तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना आसरा रेल्वे पुलाखाली आज सोमवारी दुपारी एक वाजता उघडकीस
आली .
अविनाश सिद्रामप्पा कुंभार ( वय 34 वर्ष , रा. बंकलगी , दक्षिण सोलापूर ) असे त्या मयत तरुणाचे नाव आहे .आज सोमवारी सकाळी तो आईला सोलापूर कडे जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडला होता .त्यानंतर त्याने आसरा पुलाखाली एका रेल्वे खाली आत्महत्या केली . ही घटना दुपारी एक वाजता घडली . माहिती समजताच विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवलदार जी.एस. मणुरे यांनी व सिविल हॉस्पिटलचे रुग्णसेवक लादेन यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. घटनास्थळी अविनाश कुंभार याच्या मृतदेहाचे दोन तुकडे विभागून पडले होते .मृतदेहाजवळच मोबाईल पडला होता . लादेन यांनी त्याच मोबाईल मधून मृतदेहाचे व्हिडिओ शूट केले आणि ते व्हिडिओ मृताच्या ओळखीसाठी त्याच्याच मोबाईल मधील व्हाट्सअप क्रमांकावर सेंड केला .त्यानंतर सदरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी येथील शासकीय रुग्णालयात दुपारी अडीच वाजता दाखल
केला.दरम्यान सदरचा व्हिडिओ पाहून मृताच्या एका चुलत भावाने मयताच्या सख्ख्या भावाला ही माहिती दिली .त्यानंतर नातेवाईक हे खातरजमा करण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले तेव्हा मृताची ओळख पटली गेली .
अविनाश हा विवाहित असून तो पूर्वी एका बँकेत काम करायचा . त्याच्या पश्चात आई , पत्नी , एक भाऊ , एक बहीण असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 4