
करमाळा – श्री कमला देवी चरणी मृणाल गिरिष ताटी रा.अहिल्यानगर यांच्या कडून अंदाजे ११,०००/ ₹. किंमतीचे चांदीचे पैंजण श्रीकमला भवानी चरणी अर्पण करण्यात आले. या वेळी श्रीकमला देवी मंदिर समिती कडून मंदिर पुजारी रामदास सोरटे, वैभव सोरटे , यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच मंदिर पुजारी चि.वैभव रामदास सोरटे. यांच्या आज असणाऱ्या वाढदिवसानिमित्त जतन संवर्धन कामास रोख देणगी रु .५००/- (पाचशे रुपये फक्त)प्राप्त झाली आहे. यावेळी मानकरी, सेवेकरी, भक्तगण इत्यादी उपस्थित होते.
श्री कमलादेवी मंदिराचे पुरातन दगडी स्वरूपातील असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्तांना मिळणार आहे. श्री जगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या संयोजकाने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन कामास गेल्या वर्षापासून सुरुवात करण्यात आलेली आहे. मंदिर जतन संवर्धनाचे काम प्रगतीपथावर असून भक्तांच्या देणगी रूपी सहकार्यातून या कामास सुरुवात करण्यात आलेली आहे.
श्री कमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट करमाळा यांचे कडून करण्यात आलेले आहे. तसेच ऑनलाईन देणगीची सुविधाही उपलब्ध आहे.
Post Views: 8