टेंभुर्णी येथील गॅस भडक्यात भाजलेल्या वडीलाचा अखेर मृत्यू
सोलापूर – घरामध्ये गॅस सिलेंडर च्या भडक्यात भाजून जखमी झालेल्या टेंभुर्णी येथील एका 35 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मृत्यू झाला .
दयानंद मोहन कावरे (वय 35 वर्ष ,रा टेंभुर्णी )असे त्या मयत तरुणाचे नाव असून सोमवार 25 मे रोजी सायंकाळी स्वयंपाक घरात गॅस सिलेंडर चा भडका उडाला होता . यात दयानंद कावरे यासह त्याची मुलगी गौतमी दयानंद कावरे ( वय 13 वर्षे ,दोघे राहणार टेंभुर्णी ) भाजून जखमी झाले होते . त्यांना एका खाजगी दवाखान्यात प्रथम उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात रात्री अकरा वाजता मेव्हणा विशाल थोरात यांनी दाखल केले असता दयानंद याचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला .



















