वैराग (प्रतिनिधी – प्रभाकर क्षीरसागर):
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील ‘शेळगाव आर’ हे गाव केवळ एक ग्रामीण परिसर नसून तो एक ज्वलंत इतिहास, उच्च विद्याभूषितांची परंपरा आणि समृद्ध संस्कृतीचा त्रिवेणी संगम आहे. शिपायापासून ते थेट क्लास वन अधिकाऱ्यांपर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून ते भारतीय संरक्षण दलापर्यंत गावातील सुपुत्रांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. भावी पिढ्यांना आपल्या गावातील या महनीय व्यक्तींचा आणि त्यांच्या पदांचा अभिमान वाटून त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी घेतलेला हा एक सविस्तर आढावा.
प्राचीन ऐतिहासिक व आध्यात्मिक वारसा
शेळगाव आर गावाला प्राचीन काळापासून अत्यंत समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावात पुरातन काळातील प्रसिद्ध, वास्तुकलेचा अद्भूत नमुना असलेली हेमाडपंती महादेव मंदिर आणि खंडोबा मंदिर दिमाखात उभी आहेत. ही मंदिरे गावाच्या प्राचीनतेची आणि सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतात. अध्यात्माची ही परंपरा आजही अखंडितपणे सुरू असून, गावात वारकरी संप्रदाय आणि भजनी मंडळ मोठ्या संख्येने कार्यरत आहेत.
शैक्षणिक क्रांती आणि संस्थात्मक जाळे
गावाच्या विकासात शिक्षणाचा सिंहाचा वाटा आहे. गायकवाड घराण्यातील शिक्षण महर्षींनी गावात तब्बल १३ शैक्षणिक संस्थांचे जाळे निर्माण करून ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी ज्ञानाची कपाटे खुली केली आहेत. गावात प्रामुख्याने ‘एल. जी. शिक्षण संकुल शेळगाव’ आणि ‘शेळगाव शिक्षण प्रसारक मंडळ’ या दोन मोठ्या नामांकित शिक्षण संस्था कार्यरत आहेत.
गावात अंदाजे १०० पेक्षा जास्त शिक्षक वर्ग असून हा सुशिक्षित वर्ग गावाला वैचारिक दिशा देण्याचे काम करत आहे. याशिवाय, जिल्हा परिषद शाळा आणि ४ अंगणवाड्या अविरतपणे सुरू आहेत.
गावातील प्रशासकीय वैभव: अधिकार्यांची यादी
शेळगाव आर मधील सुशिक्षित वर्गाची झेप थक्क करणारी आहे. गायकवाड आणि शिंदे घराण्यांत प्रत्येकी २ क्लास वन (Class 1) अधिकारी कार्यरत आहेत. गावातील प्रमुख प्रशासकीय, तांत्रिक व वैद्यकीय अधिकार्यांची पदे त्यांच्या श्रेणीनुसार खालीलप्रमाणे आहेत:
१. केंद्रीय व राज्यस्तरीय उच्च प्रशासकीय अधिकारी (Class 1 / राजपत्रित)
डॉ. ऋचा विष्णू गोडगे: देशात ८४ वा क्रमांक मिळवून वैद्यकीय अधिकारी (Medical Officer / Assistant Divisional Medical Officer) म्हणून गौरवशाली निवड.
अतुल देवकर: उपवनरक्षक (MPSC – Deputy Conservator of Forests).
राजन शिंदे: सहायक उप प्रादेशिक परिवहन अधिकारी (MPSC – Asst. RTO).
प्रदिप गायकवाड: डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सार्वजनिक बांधकाम विभाग (MPSC – PWD).
रोहित बादगुडे: डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर (MPSC).
अमृता गुंड: कक्ष अधिकारी, मंत्रालय, महाराष्ट्र शासन, मुंबई (MPSC).
२. वैद्यकीय अधिकारी व तज्ज्ञ (Medical Sector)
डॉ. मंगेश देवकर: M.S. स्त्रीरोगतज्ज्ञ, DGO प्रसुती व स्त्रीरोगतज्ज्ञ.
डॉ. कीर्ती ताकमोगे: MBBS वैद्यकीय अधिकारी, वाशी.
डॉ. महेश शेरखाने: M.B.B.S. (एम्स – AIIMS नागपूर).
डॉ. विश्वजीत गायकवाड: M.B.B.S. अंबाजोगाई.
डॉ. अभिजित खंडागळे: M.B.B.S. अमरावती.
डॉ. अनिकेत नितिन शेरखाने: M.B.B.S. सोलापूर.
देवराजजी जाधव: M.D. (आयुर्वेदिक), इसलापूर.
डॉ. योगेश गायकवाड: BDS, बेळगाव.
समर्थ उबाळे: आयव्हीएफ एम्ब्रियोलॉजिस्ट (IVF Embryologist).
३. तांत्रिक, अभियांत्रिकी व आयटी क्षेत्र (IIT / NIT / MNC)
अमोल देवकर: बहुराष्ट्रीय कंपनीत (MNC) सोल्यूशन आर्किटेक्ट मॅनेजर.
युवराज देवकर: आयआयटी (IIT) हैदराबाद येथून गावातील पहिले आयआयटी इंजिनियर.
पृथ्वीराज गायकवाड: एनआयटी (NIT) मधून एम.टेक (M.Tech).
प्रसाद देवकर: एम.टेक पूर्ण करून हिंजवडी आयटी पार्क (पुणे) येथे कार्यरत.
आरती देवकर: एनआयटी (NIT) मेघालय येथे उच्च शिक्षण घेत आहेत.
४. कर विषयक व इतर प्रशासकीय सेवा (Class 2 / Class 3)
मदन शिंदे: राज्य कर निरीक्षक, पुणे (MPSC – STI).
भैरु सिरसाट: राज्य कर निरीक्षक, मुंबई (MPSC – STI).
राहुल कांबळे: सहायक अभियंता, महावितरण बार्शी.
नागनाथ मोरे: सहायक अभियंता, पीडब्ल्यूडी जालना (MPSC).
राधा अडसूळ: औद्योगिक निरीक्षक (Industrial Inspector).
जनक गुंड: एएसओ (ASO) व लोको पायलट.
सिता बादगुडे: कृषी सेवक.
५. शैक्षणिक, सुरक्षा व क्रीडा क्षेत्र
डॉ. पल्लवी गायकवाड: केमिस्ट्री विषयात पीएचडी (Ph.D) संपादन.
वसंत गायकवाड: प्राध्यापक (उमरागा).
रामकृष्ण जाधव: पोलीस दल (राज्य उत्पादन शुल्क).
शांता देवकर: डी.जी. ऑफिस, मुंबई.
संचिता लपारे: १६ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात राज्यस्तरीय खेळाडू.
संरक्षण दल (Indian Army & Navy): देशाच्या रक्षणासाठी इंडियन आर्मीत ९ मेजर व सैनिक (ज्यामध्ये राम खंडागळे देशाचे रक्षण करत आहेत) आणि नेव्ही आर्मीमध्ये (नौदल) २ सुपुत्र सेवा बजावत आहेत. गावात कार्यालयीन शिपाई वर्गात १५ जण कार्यरत आहेत.
शहराला मात देणाऱ्या आधुनिक सुविधा
आज शेळगाव आर हे गाव पूर्णपणे हायटेक आणि स्वावलंबी बनले आहे. मोठ्या शहरांमध्ये आढळणाऱ्या ‘डी मार्ट’च्या धर्तीवर या गावात अत्याधुनिक ‘एस मार्ट’ (S Mart) यशस्वीपणे उभे राहिले असून, गावकऱ्यांना सर्व जीवनावश्यक वस्तू एकाच छताखाली मिळतात.
आर्थिक व व्यवसाय: शेतकऱ्यांसाठी मोठे दूध संकलन केंद्र आणि आर्थिक व्यवहारांसाठी नॅशनल बँक (National Bank) उपलब्ध आहे.
आरोग्य: चोवीस तास कार्यरत असणारा सुसज्ज सरकारी दवाखाना.
राजकीय वजन: गावातील काही सुपुत्रांनी महाराष्ट्राचे उपनेते पद तर काहींनी उपसभापती पद भूषवून गावाचा नावलौकिक राज्यपातळीवर पोहोचवला आहे.
येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादायी संदेश
गावकऱ्यांचे एक स्वप्न आहे की, या सुशिक्षित वर्गाच्या जोरावर शेळगावचा एक ना एक सुपुत्र भविष्यात दिल्लीच्या तख्तावर बसेल! शेळगाव आर गावाने प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तबगार हिऱ्यांची निर्मिती केली आहे. हे केवळ एका गावाचे यश नसून सामूहिक कष्ट, उच्च शिक्षण आणि प्रबळ इच्छाशक्तीचे उत्तम प्रतीक आहे. आजच्या तरुण पिढीने याच पाऊलावर पाऊल ठेवून शिक्षणाची कास धरावी आणि देशाच्या सर्वोच्च पदांवर मजल मारावी, हाच या बातमीमागचा मुख्य उद्देश आहे.
Post Views: 6