सोलापूर – कोणताही निरोप समारंभ आनंदाचा असला तरी थोडासा भावूक करणारा देखील आहे. ग्रंथालय व्यवस्थापन, वर्गीकरण, सूचीकरण, वाचक सेवा आणि ग्रंथालयाच्या विविध कार्यपद्धतीबाबत मौल्यवान ज्ञान ग्रंथपालन वर्गाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले याचा समाधान बाटते असे मनोगत प्रा. अविनाश गायकवाड,यांनी ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा वर्ग 2026 च्या सोलापूर केंद्राच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभ प्रसंगी व्यक्त केले.
यावेळी ग्रंथपालन वर्गाच्या सहा महिन्याच्या कालावधीत विद्यार्थ्यांना दिले गेलेले ग्रंथपालन वर्गाचे प्रशिक्षण याबाबत प्रा. गणेश फंड, प्रा. जाफर बांगी, प्रा. दत्ता मोरे, वर्ग व्यवस्थापक ग्रंथमित्र कुंडलिक मोरे यांनी आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांमधून प्रथमेश बनसोडे, वेदिका चव्हाण, संध्याराणी मोरे, सुजाता हुळी, अंबिका सुलाखे इत्यादीनी आपले मनोगत व्यक्त करत सर्वाचे आभार मानले केले.
यावेळी ग्रंथपालन वर्गाच्या विद्यार्थ्याकडून जिल्हा ग्रंथालय संघास स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट देण्यात आली.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गीतांजली गंभीरे यांनी केले.
Post Views: 9