सोलापूर – संपुर्ण महाराष्ट्रात उन्हाची तापमानात वाढ होत असून हे तडाका लक्षात घेऊन रणरणत्या उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी सामाजिक कामात अग्रेसर असणारी आस्था सामाजिक संस्था व ज्ञानज्योती ग्रामीण अभीव्रूद्धी ( बेळगावी) संस्थेच्या वतीने सोलापूरातील 100 वंचित,बेघर,निराधार, गरीबांना हॅन्ड वॉश वाटिका तेल, टूथपेस्ट साबण, गुलकोप्लस एनर्जी सॉफ्ट ड्रिंक, दंतमंजन किट वाटप करण.यात आले तसेच , स्वच्छतेबाबती व आरोग्याच्या बाबतीत देखील मार्गदर्शन करण्यात आले.
या किट वाटप प्रसंगी कैलास शिरसी ( समन्वयक ज्ञानज्योती ग्रामीण अभिवृद्धी संस्था, बेळगावी) विजयकुमार बिराजदार (अध्यक्ष वीरशैव व्हिजन समितीचे) आनंद तालिकोटी ( अध्यक्ष आस्था सामाजिक स़स्था) सुहास छंचुरे ( प्रसिद्धी प्रमुख आस्था सामाजिक स़स्था) यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वेदांत तालिकोटी, पिंटू कस्तुरे सुरज छंचुरे, यांनी परिश्रम घेतले.
आस्था सामाजिक संस्था गेल्या दहा वर्षापासून रोज वंचित गरीब बेघर, निराधार यांना अविरतपणे मोफत अन्नदान करण्याचे काम करते तरी सोलापूरात कुठेही कोणत्याही कार्यक्रमांमध्ये किंवा घरामध्ये अन्न शिल्लक राहिल्यास असल्यास तर आमच्या संस्थेची संपर्क साधावे
Post Views: 27