सोलापूर : मानव जातीचे अस्तित्व टिकविण्यासाठी व शाश्वत विकासासाठी नैसर्गिक पर्यावरणाचे संरक्षण व संवर्धन हा विषय केवळ चर्चेचा विषय न राहता तो प्रत्येकाचा जगण्याचा, आचरणाचा विषय झाला पाहिजे.
प्रत्येकाची जीवनशैली निसर्गस्नेही हवी.त्यासाठी तरुणांनी पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेचे मार्गदर्शक प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले
ते फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा व महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था मुलांचे, सोलापूर यांच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. एम. एम. बिडकर हे होते.
तर व्यासपीठावर एफ. पी. ए.आय. सोलापूर शाखेचे चेअरपर्सन प्रा. डॉ. एन. बी. तेली, व्हाईस चेअरपर्सन प्रा. डॉ. आयेशा रंगरेज, सदस्या प्रा. डॉ. विजया महाजन, डॉ. राजीव प्रधान, कवि मारुती कटकधोंड, भरत काटीकर व शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आदी उपस्थित होते.
अध्यक्षीय समारोप करताना प्राचार्य डॉ. एम. एम. बिडकर म्हणाले की पर्यावरण संवर्धनासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा. नैसर्गिक ऊर्जा स्तोत्रांचा जास्तीत जास्त वापर व्हावा यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे वरिष्ठ गटनिदेशक मयुरी महेर, गटनिदेशक आर. एम. कंपनी, गटा निदेशक एन.एस.एस. कार्यक्रमअधिकारी श्रीमती म्हेत्रे एन. एस., बाळकृष्ण पुतळे, संकेत साखरे अनिल मसरे आदींसह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
कार्यक्रमाचे स्वागत सुगतरत्न गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन वीरेंद्र परदेशी यांनी केले. प्रास्ताविक प्रा. डॉ. विजया महाजन यांनी केले. तर आभार आयेशा रंगरेज यांनी मानले.
Post Views: 15