जेऊर – उमरड (ता. करमाळा) येथे राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त राजमाता ग्रुपच्यावतीने स्मशानभूमीची स्वच्छता करण्यात आली. गावातील तरुणांनी एकत्र येत सामाजिक उपक्रम म्हणून स्मशानभूमीची स्वच्छता केली. तरुणांनी स्मशानभूमी परिसरातील अस्वच्छतेचे साम्राज्य संपुष्टात आणले त्या ठिकाणचे टाकाऊ पदार्थ,गवत, प्लॅस्टिकच्या कचऱ्याची स्वच्छता केली. तसेच स्मशानभूमी परिसरातील एका मनोरुगणास त्याच्या गावी सोडविण्यात आले. तरुणांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात करमाळा पंचायत समिती सदस्य अतुल पाटील यांनी तरुणांनी सामाजिक उपक्रम हाती घ्यावेत असा संदेश दिला होता. त्याचे अनुकरण करत गावातील होतकरू तरुणांनी स्मशानभूमी स्वच्छतेची मोहीम हाती घेतली यामध्ये सागर मारकड,विशाल मारकड,पवन मारकड,सागर जाधव,निखिल मारकड,ज्ञानेश्वर कदम,डॉक्टर बंडगर,जनार्धन मारकड,धनंजय मारकड,तुषार मारकड माऊली मारकड ,श्रीकांत मारकड, संदिप मारकड,यशराजे पाटील,किसन हरणावळ,आगतराव मारकड, गणेश मारकड,किसन मारकड इत्यादी युवक सहभागी होते.
Post Views: 35