आगामी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोडनिंब (ता.माढा) ग्रामपंचायतीच्या प्रभागनिहाय आरक्षणाची घोषणा करण्यात आली आहे. एकूण सहा प्रभागांतील विविध प्रवर्गांसाठी जागांचे आरक्षण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार इच्छुक उमेदवारांनी निवडणूक तयारीला सुरुवात केली आहे.शहरातील प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जाती (पुरुष), ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक २ मध्ये ओबीसी पुरुष, सर्वसाधारण महिला आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी जागा राखीव आहेत.प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जाती महिला, ओबीसी महिला आणि सर्वसाधारण महिला तर प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी संधी मिळाली आहे. प्रभाग क्रमांक ५ मध्ये अनुसूचित जाती पुरुष, ओबीसी पुरुष आणि सर्वसाधारण महिला यांच्यासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तसेच प्रभाग क्रमांक ६ मध्ये अनुसूचित जाती महिला व दोन सर्वसाधारण जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.आरक्षण जाहीर झाल्यानंतर मोडनिंब शहरातील राजकीय हालचालींना वेग आला असून विविध प्रवर्गातील इच्छुक उमेदवारांकडून निवडणूक लढविण्याबाबत चाचपणी सुरू झाली आहे.
मोडनिंब ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा सरपंच पदासाठी चुरशीची लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये उत्सुकता वाढली असून गावातील राजकीय वातावरण रंगले आहे. आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकीचे वातावरण अधिक रंगण्याची शक्यता ग्रामस्थातून व्यक्त होत आहे.
Post Views: 9