सोलापूर : सम्राट चौक रोडवरील तिरुपती हॉटेल लॉजच्या मागील बाजूस आणि लगतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा व राडारोडा अनेक दिवसांपासून साचून असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
संबंधित ठिकाणी सुमारे १५ दिवसांपासून ते महिनाभरापर्यंत कचरा उचलण्यात आलेला नाही. परिसरात दोन-तीन अपार्टमेंट्ससह ६० ते १०० कुटुंबांचा वावर असून, त्यांच्या दैनंदिन वापराच्या रस्त्यावरच कचऱ्याचा ढिग साचला आहे. अलीकडील पावसामुळे कचऱ्यात ओलावा साचल्याने दुर्गंधी वाढली असून भटकी जनावरेही येथे वावरत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
महापालिकेने घराघरांतून घंटागाड्यांद्वारे कचरा संकलनाची व्यवस्था केली असली, तरी सार्वजनिक ठिकाणी साचणारा कचरा हटविण्यासाठी कार्यवाही करावी.
महापालिका प्रशासनाने संबंधित ठिकाणाची तातडीने स्वच्छता करून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच अशा ठिकाणी नियमित देखरेख ठेवावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
Post Views: 11