
मुंबई : टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेईकल्स लिमिटेड (TMPV) कंपनीने आपल्या एसयूव्ही आणि ईलेक्ट्रीक व्हेईकल्सच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय आज जाहीर केला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्रवासी वाहनांच्या पोर्टफोलिओच्या किमतींमध्ये कमाल १.५% पर्यंत वाढ केली जाईल. ज्यामध्ये अंतर्गत ज्वलन इंजिन (ICE) आणि इलेक्ट्रिक वाहने (EV) समाविष्ट आहेत. सुधारित दरवाढ येत्या १ जुलै २०२६ पासून लागू होईल.
ही दरवाढ वाढत्या उत्पादन खर्च आणि सततच्या महागाईच्या दबावाचा परिणाम काही प्रमाणात कमी करण्यासाठी करण्यात येत आहे. टीएमपीव्ही या वाढीचा मोठा भाग स्वतः उचलत असली तरी, त्यातील काही हिस्सा ग्राहकांवर या दरवाढीद्वारे टाकण्यात येत आहे. दरवाढीची मर्यादा विविध मॉडेल्स आणि व्हेरिएंटनुसार बदलू शकते, ज्यामुळे प्रत्येक उत्पादनाचे एकूण मूल्य प्रस्ताव कायम राखले जाईल.




















