बार्शी – शहरातील मांगडे चाळ परिसरातील रुद्राक्षा बाबासाहेब मांगडे (वय ४ वर्षे) ही चिमुकली आज सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान घरातील कोणालाही न सांगता घरातून निघून गेली होती. मुलगी दिसून न आल्याने तिचे वडील बाबासाहेब दगडू मांगडे यांनी बार्शी शहर पोलीस ठाणे येथे येऊन माहिती दिली व मुलीचा शोध घेण्याची विनंती केली.
बार्शी शहर पोलिसांकडून शहर परिसरात शोध घेत असताना सदर मुलगी टिळक चौक, बार्शी येथे सुखरुप मिळून आली. त्यानंतर तिला पोलीस ठाण्यात आणून तिच्या आई-वडिलांच्या समक्ष विचारपूस करण्यात आली. यावेळी तिने खेळणे घेण्यासाठी घरातून आल्याचे सांगितले.
त्यानंतर मुलगी सुरक्षित असल्याची खात्री करुन तिला तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आले. मुलगी काही तासातच सुखरुप मिळाल्याने परिसरातुन बार्शी शहर पोलीस ठाण्याचे आभार मानण्यात आले.
ही कामगिरी पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली संगप्पा मुळे, राहुल बोंदर, संतोष जाधवर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
Post Views: 8