अक्कलकोट – मैंदर्गी येथून दुधनीकडे कामानिमित्त मोटार सायकलवरून जाणाऱ्या युवकानां कारने ठोकारल्याने दोन युवकाचां मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की , दिंनाक १७ जून रोजी रात्री ८ वा. चे सुमारास मैंदर्गी ते दुधनी कडे जाणाऱ्या रस्त्या वर गणेश मंदीर जवळील भुती यांचे शेताजवळ मंजुनाथ शिवानद मसुती व मित्र शिवराजकुमार शरणय्या गुत्तेदार हे मंजुनाथ शिवानद मसुती याच्या ताब्यातील होन्डा युनिकॉर्न कंपनीची मोटर सायकल ( MH १३ EQ ०९२७ यावरून दुधनीकडे जात हो ते त्यांच्या मोटर सायकलीस समोरून एक पांढरे रंगाची ह्युदाई कंपनीची क्रेटा कार ( MH १३ EK ९७०९ यावरील चालक भिमराया शरणप्पा बहिरगोंडे ( रा. रोहीणी नगर, विचापुर रोड, सैफुल सोलापुर ) याने त्याच्या ताब्यातील सदर कार हयगयीने, अविचाराने, रस्त्याच्या परिस्थिती कडे दुर्लक्ष करून, भरधाव वेगाने चालवुन मोटर सायकलीस जोरदार धडक दिली . मोटर सायकल वरील मंजुनाथ शिवानंद मसुती (वय २३ वर्षे )व मित्र शिवराजकुमार शरणय्या गुत्तेदार (वय २८ वर्षे दोघे रा. मैंदर्गी ता. अक्कलकोट जि. सोलापुर ) यांना गंभीर जखमी करून त्यांचे मरणास कारणीभुत झाला आहे. या अपघाता प्रकरणी दक्षिण पोलीस ठाणे अक्कलकोट येथे नोंद झाली आहे. याबाबत फिंर्याद – रमेश बसवराज मसुती ( वय ३४ वर्षे रा. मैंदर्गी ता. अक्कलकोट ) यांनी दिली आहे.
पुढील तपास एपीआय माने हे करत आहेत.
Post Views: 10