
सांगोला – सांगोल्यातील आपुलकी प्रतिष्ठानच्या वतीने शहर व तालुक्यातील ५ गरजू महिलांना उपजीविकेची साधने वाटप करण्यात आली. आपुलकी प्रतिष्ठान कार्यालय येथे झालेल्या कार्यक्रमात पत्रकार भारत कदम, निसार तांबोळी व उद्योजक राजेंद्र बिरगे यांच्या हस्ते मेडशिंगी येथील निर्मला मोरे, शालन अवघडे, सांगोला येथील माया इंगोले यांना शेळी, पुष्पा पारसे यांना शिलाई मशीन तर वाटंबरे येथील उज्वला पवार यांना पिठाची गिरणी उपजीविकेसाठी भेट देण्यात आली. यावेळी भारत कदम यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष राजेंद्र यादव यांनी केले. कार्यक्रमाला आपुलकी प्रतिष्ठानचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post Views: 12