
श्रीपूर – मुळचे श्रीपूर ता माळशिरस( सध्या वास्तव्य पुणे ) चेतन जयंत भोसले यांची समकालीन चित्रकार म्हणून भारत सरकारच्या प्रतिष्ठित ज्युनियर फेलोशिप साठी निवड करण्यात आली . देशपातळीवर या फेलोशीप साठी महाराष्ट्रातून तीन चित्रकार निवडले गेले आहेत . चेतन भोसले यांचे निवडी बदल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे महाराष्ट्रातील समकालीन चित्रकार व इंस्टॉलेशन कलाकार चेतन जयंत भोसले यांची भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालया तर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ज्युनिअर फेलोशीप २०२५/२०२६साठी निवड झाली आहे . ही निवड दृश्यकला चित्रकला या क्षेत्रात करण्यात आली आहे व देशभरातील निवडक कलाकारांमध्ये त्यांचा समावेश आहे संस्कृती मंत्रालयाच्या तज्ञ समितीने कला क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य संशोधनाची क्षमता सर्जनशील दृष्टी आणि सांस्कृतिक योगदान यांचा विचार करून ही निवड करण्यात आली आहे . ही फेलोशिप भारतातील उदयोन्मुख आणि प्रतिभावान कलाकारांना त्यांच्या संशोधनाधारित कला प्रकल्प साठी दिली जाते . चेतन भोसले हे समकालीन चित्रकला आणि इंस्टॉलेशन आर्ट या क्षेत्रात गेली अनेक वर्षे कार्यरत आहेत त्यांच्या कलाकृती मध्ये निसर्ग स्मृती संघर्ष अध्यात्म सामाजिक वास्तव आणि पर्यावरणाच्या प्रश्न यांचे प्रभावी चित्रण आढळते त्यांनी विविध राज्यस्तरीय व राष्ट्रीय कला प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवून अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त केले आहेत. पुण्यातील अभिनव कला महाविद्यालय चे विद्यार्थी असलेले चेतन भोसले यांनी आपल्या कला साधने द्वारे भारतीय समकालीन कलेमध्ये स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे ही फेलोशिप त्यांच्या कलात्मक संशोधनाला नवी दिशा तसेच भविष्यातील महत्वकांक्षी कला प्रकल्पांना बळ देणारी आहे. यावर चेतन भोसले यांनी फेलोशिप माझ्या कलात्मक प्रवासातील अत्यंत महत्वाचा टप्पा आहे या माध्यमातून मला संशोधन प्रयोगशीलता आणि सर्जनशील अभिव्यक्ती यांना अधिक व्यापक स्वरूप देता येईल अशी प्रतिक्रिया दिली . भारत सरकारची ज्युनियर फेलोशिप ही देशातील कला साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील संशोधन व सर्जनशील कार्याला प्रोत्साहन देणारी अत्यंत प्रतिष्ठेची योजना मानली जाते.
Post Views: 37