सांगोला – बाजीराव संपत यमगर (वय-५०), रा.दिवाण वस्ती, घेरडी, ता.सांगोला, जि.सोलापूर याने आपले शेतातील गट क्र.१०८९ मधील ज्वारीचे पिकालगत बेकायदा बिगर परवाना एकुण ८ किलो ३८२ ग्रॅम वजनाचा ४ लाख १७ हजार १०० रू.किंमतीची ३ गांजाची झाडे बाळगुन रविवार दि.२१ जून रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळुन आला आहे. यामध्ये ३ लाख १७ हजार ८५० एक गांजाचे हिरव्या रंगाचे ओलसर पानाचे उग्र वासाचे अंदाजे ६ फूट उंचीचे गांजाचे झाड मुळासकट उपटून काढून त्याची छाटणी करून पाने व देठे, तसेच बिगर पानाचे व फांदीचे ४ फूट उंचीचे व ५ फूट उंचीचे झाडे मुळासह उपटून काढून सर्व एकत्रित पांढ-या प्लास्टिक पोत्यामध्ये भरून त्यांचे एकूण वजन ६ किलो ३५७ ग्रॅम तसेच ९९ हजार २५० रुपये किमतीचे गांजाच्या झाडाखाली ठेवण्यात आलेले गांजाचे हिरव्या रंगाचे पानाचे एका पांढ-या रंगाच्या प्लास्टिक पोत्यामध्ये भरून त्याचे वजन १ किलो ९८५ ग्रॅम असा माल जप्त करण्यात आला आहे. याबाबत नारायण रामचंद्र गोलेकर, सहा.पोलीस उपनिरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण यांनी गुंगीकारक औषधी द्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम प्रमाणे कायदेशिर फिर्याद सांगोला पोलीस ठाणे येथे दिली आहे.