Saturday, June 27, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

आमदार सोपल बंगला आगप्रकरणी २ आरोपींना, ४ दिवसांची पोलीस कोठडी

तरुण भारतbyतरुण भारत
June 26, 2026
in crime
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
बार्शी – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या आगळगांव रोडवरील निवासस्थानावर पेटते फटाके व स्फोटक स्वरुपाचे साहित्य फेकून आग लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या नागेश बाळू मोहिते व निखिल उर्फ अंबादास भारत रणझुंजारे या दोन आरोपींना बार्शी न्यायालयाने २९ जूनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेची जिल्हाभरात मोठी चर्चा सुरु असून वरिष्ठ पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत तपासाला वेग दिला आहे.
या प्रकरणी आमदार सोपल यांचे बंधू सुधीर गंगाधर सोपल (वय ७८) यांनी बार्शी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. फिर्यादीनुसार, मंगळवार दि. २३ जून रोजी मध्यरात्री १.१५ वाजण्याच्या दरम्यान ते आपल्या निवासस्थानी झोपलेले असताना घराच्या पाठीमागील बी.टी.एम. पॅव्हेलियन मैदानाच्या दिशेने पेटत्या अवस्थेतील फटाके व स्फोटके घराच्या परिसरात येऊन पडू लागली. मोठ्या आवाजामुळे जाग आल्यावर त्यांनी खिडकीतून पाहिले असता परिसरातील काही झाडांना आग लागल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या घटनेबाबत पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ दखल घेतली. सोलापूर येथील फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळी भेट देऊन सुमारे दोन तास सखोल पाहणी व पुरावे संकलनाचे काम केले. तपासादरम्यान पोलिसांनी नागेश बाळू मोहिते व निखिल ऊर्फ अंबादास भारत रणझुंजारे (दोघेही रा. बार्शी) यांना ताब्यात घेत अटक केली.
गुरुवारी दि. २५ जून रोजी दोन्ही आरोपींना बार्शी येथील न्यायालयात न्यायाधीश पी. व्ही. राऊत यांच्यासमोर हजर करण्यात आले. तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब जाधव व सरकारी पक्षाने आरोपींसोबत असलेल्या इतर संशयितांचा शोध, गुन्ह्यात वापरलेली वाहने, तसेच ही घटना कोणत्या उद्देशाने घडविण्यात आली याचा तपास करण्यासाठी सात दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती.
आरोपींच्या वतीने ॲड.महेश जगताप यांनी बचावत्मक बाजू मांडताना आरोपींची राजकीयदृष्ट्या गुन्ह्यात नावे घेतल्याचा युक्तिवाद केला.
दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपींना २९ जूनपर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. यावेळी सरकारी वकील ॲड. राहुल काजळे, फिर्यादी पक्षाचे ॲड. विकास जाधव तसेच तपास अधिकारी एपीआय बाळासाहेब जाधव उपस्थित होते.
Post Views: 21
Previous Post

२७ जूनला अंधेरीत टीपीएल-३ इनडोअर क्रिकेट लीग; २ लाखांहून अधिक रोख पारितोषिके

Next Post

शिवालय शैक्षणिक संकुलात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
शिवालय शैक्षणिक संकुलात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

शिवालय शैक्षणिक संकुलात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती उत्साहात साजरी

ताज्या बातम्या

दत्त अवतारी स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे सेवाकार्य ऐकून भारावलो – न्यायमूर्ती ए.एम.बादर

June 26, 2026

आषाढी वारीसाठी जि.प.ची ‘सुट्टीतही ड्युटी’; सीईओंचे निर्देश

June 26, 2026

अहिल्यानगर येथे देवकर, देसर्डा, राजपूरे परिवारच्या वतीने झाला नगरसेवक महेश इंगळे यांचा सत्कार

June 26, 2026

उत्स्फूर्त उत्साहात संपन्न झाली छबिलदास इंग्लिश मीडियम स्कूलची ‘मास्टरशेफ स्पर्धा २०२६-२७’!

June 26, 2026
खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध; अखिल भारतीय डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटना

June 26, 2026
शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

शहीद स्मारक लोकार्पण सोहळ्यात कुंभेजचे अनिल कादगे ‘यशकल्याणी समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

June 26, 2026
निंबर्गीचे गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

निंबर्गीचे गंगाधर बिराजदार यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार

June 26, 2026
अबॅकस व वैदिक गणिताची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न

अबॅकस व वैदिक गणिताची राष्ट्रीय स्पर्धा संपन्न

June 26, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0939860

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697