
सोलापूर – शिवालय प्राथमिक-माध्यमिक आश्रम शाळा व ओम वैष्णव कनिष्ठ महाविद्यालय, तळे हिप्परगा येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमास प्राचार्या कांचन वाघचवरे, यांच्या अध्यक्षतेखाली व प्रमुख उपस्थिती होत्या.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन कांचन वाघचवरे यांच्या हस्ते करून कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी शाहू महाराजांच्या कार्याविषयी आपली मनोगते व्यक्त केली. किशोर जाधव यांनी शाहू महाराजांचे जीवनकार्य, सामाजिक सुधारणा आणि लोककल्याणकारी विचार यांची सविस्तर माहिती दिली.
प्राचार्या कांचन वाघचवरे यांनी शाहू महाराजांच्या जीवनातील विविध प्रसंग सांगत त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या, “राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी वेदोक्त चळवळ, वसतिगृह चळवळ, प्राथमिक शिक्षण चळवळ, अस्पृश्यता व जातिवाद निर्मूलन चळवळ, भटक्या-विमुक्त समाजाच्या उद्धाराची चळवळ, सत्यशोधक चळवळ, स्त्रीदास्यमुक्ती चळवळ, ब्राह्मणेतर चळवळ आणि कामगार चळवळ अशा अनेक सामाजिक परिवर्तनाच्या चळवळी उभारल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी राजकुमार शिंदे, शिवशंकर माने, किरण शिंदे, बाळासाहेब भोसले, सिद्धारूढ रेऊरे, मारुती शिंदे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेताजी इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन सुभाष चव्हाण यांनी केले.




















