
अक्कलकोट – दत्त अवतारी श्री स्वामी समर्थांची महिमा व वटवृक्ष देवस्थान समितीचे अविरत सुरू असलेले सेवाकार्य ऐकून आपण भारावून गेलो अशी भावना पाटणा उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती तथा महाराष्ट्र राज्य मानवाधिकार आयोग मुंबईचे अध्यक्ष ए.एम.बादर यांनी व्यक्त केली.
ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास सहकुटूंब भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. यावेळी मंदीर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांनी मा.न्यायमुर्ती ए.एम.बादर व कुटूंबियांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला. यावेळी मा.न्यायमुर्ती ए.एम.बादर बोलत होते. पुढे बोलताना न्यायमूर्ती ए.एम.बादर यांनी देवस्थानचे शिस्तबद्ध नियोजन व भाविकांप्रती असलेली आस्था कौतुकास्पद आहे. मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे यांचे विनयशील व्यक्तिमत्त्व हे देवस्थानच्या नाव लौकिकाला साजेसा आहे त्यामुळेच श्री स्वामी समर्थानी त्यांना स्वामी सेवेची अमूल्य अशी संधी दिली आहे. येथील आदरतिथ्य व स्वामी दर्शन आजीवन स्मरणात राहतील असेही मनोगत व्यक्त केले. अक्कलकोट न्यायालयाचे न्यायाधीश मुकुल कल्याणकर, सहन्यायाधीश श्रीमती एन.ए.एल.शेख, प्रथमेश इंगळे, सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, अक्कलकोट न्यायालयातील स्वप्नील मोरे, बाहेरमठ, अविनाश सुरवसे व पोलीस उपनिरीक्षक रणवरे, श्रीशांत कदम, श्रीशैल गवंडी, समर्थ स्वामी, संतोष जाधव फुटाणे, विपुल जाधव, श्रीकांत मलवे उपस्थित होते.
फोटो ओळ – पाटणा उच्च न्यायालयाचे मा.न्यायमूर्ती ए.एम.बादर यांचा देवस्थान कार्यालयात सहकुटुंब सत्कार करताना चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे व अन्य दिसत आहेत.
Post Views: 203