सांगोला -क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा कार्यालय सोलापूर, तालुका क्रीडा कार्यालय सांगोला व पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या
या स्पर्धेमध्ये तालुकास्तरावरती दहा खेळांचा समावेश केला गेला आहे त्यामध्ये तायक्वांदो, योगासन, कुस्ती, बुद्धिबळ, कबड्डी, खो-खो, मैदानी,क्रिकेट, कराटे व हॉलीबॉल या सर्व खेळाच्या स्पर्धा क्रीडा संकुल सांगोला येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या.
तालुकास्तरावरती घेण्यात आलेल्या सर्व खेळांच्या स्पर्धेमध्ये जे संघ व खेळाडू विजयी झाले व सहभागी झालेल्या सर्व खेळाडूंचे अभिनंदन व विजयी खेळाडूंना आपल्या तालुक्याचे व आपल्या शाळेचे नाव उज्वल करण्यासाठी क्रीडा संकुल च्या वतीने सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या.
तसेच या स्पर्धा पार पाडण्यासाठी तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक, मार्गदर्शक कोच व आजी-माजी खेळाडू यांच्या सर्वांच्या सहकार्याने स्पर्धा आपल्याला यशस्वीरित्या पार पाडता आल्या. तसेच क्रीडा संकुल समितीचे अध्यक्ष व सर्व सदस्य मंडळ व जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहरे साहेब, तालुका क्रीडा अधिकारी सचिन रणदिवे साहेब, पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी निलक साहेब ,तालुका क्रीडा संयोजक काशिलिंग शेळके सर व क्रीडा संकुल समितीचे सर्व कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्याने या स्पर्धा उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाल्या.
——
Post Views: 15