सोलापूर – जिल्हा लॉन टेनिस संघटनेने अखिल भारतीय लॉन टेनिस संघटना व महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या मान्यतेखाली आयोजित केलेल्या वरिष्ठांच्या पाचव्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत आशा कार्तिकेयन, शैलजा कुमार, उमेश बाडगर, आदित्य भावे यांनी आपापल्या गटातील प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकूच केली.
एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल आणि इलिझियम क्लबच्या मैदानावर आजपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत देशभरातून एकूण 135 खेळाडू सहभागी झाले आहेत.
स्पर्धेत 30 वर्षांवरील पुरुष गटात उमेश बाडगरने आदित्य गडियाचा 6-2, 6-1 असा तर, चौथ्या मानांकित हातिम मोडने विकास कुकरेजाचा 6-1, 6-3 असा पराभव केला. चुरशीच्या लढतीत आदित्य भावे याने गौरव राववर 7-5, 4-6, 10-7 असा विजय मिळवला. याच महिला गटात उपांत्यपूर्व फेरीत आशा कार्तिकेयन हिने शैली त्रिवेदीला 6-4, 6-3 असे पराभूत केले. तर, शैलजा कुमारने तब्बसुम शेखचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून उपांत्य फेरी गाठली.
याआधी स्पर्धेचे उदघाटन सोलापूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शंकर कांबळे, मा.जिल्हाधिकाऱ्यांचे स्वीय सहाय्यक, स्पर्धा संचालक डोसा रामाराव, एमएसएलटीएचे सह सचिव राजीव देसाई तसेच आंतरराष्ट्रीय टेनिस पटू श्रीमती संध्याराणी बंडगर, आयटीएफ सुपरवायझर वैशाली शेकटकर, शंकर कांबळे, कुलदीप सोनावणे , स्वाती पुलगम , श्वेतांबरी चव्हाण, पारुल सिक्रोरिया , कुमार रव्वा , विकास सोनी , व खेळाडू आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना पुरस्कृत आणि अखिल भारतीय लॉन टेनिस संघटनेच्या अधिपत्याखाली सोलापूर जिल्हा लॉन टेनिस संघटनेच्या वतीने वरिष्ठांच्या चौथ्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही मानांकन स्पर्धा 3 ते 9 जुलै या कालावधीत सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत खेळवली जाणार आहे.
या स्पर्धेत 30 ते 75 वर्षां पुढील पुरुष, तर 30 ते 50 वर्षां पुढील महिला खेळाडू सहभागी झाले असून यामध्ये पुरुषांच्या व महिलांच्या एकेरी, दुहेरी आणि मिश्र दुहेरी अशा लढती पाहायला मिळतील.
या स्पर्धेतील कामगिरीमुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय गुण मिळणार असून, त्यांना जागतिक क्रमवारीत पुढे जाण्यासाठी मोठी मदत होणार आहे. प्रत्येक वयोगटातील सर्वाधिक गुण मिळवणारे पहिले 4 खेळाडू जानेवारी 2027 मध्ये पोर्तुगाल येथे होणाऱ्या ‘जागतिक मास्टर्स स्पर्धे’साठी भारतीय संघात निवडले जाणार आहेत. जानेवारी ते जुलै 2026 या कालावधीत देशात अशा एकूण 11 जागतिक मानांकन स्पर्धांचे यशस्वी आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे.
निकाल: पहिली फेरी: 30 वर्षांवरील पुरुष: उमेश बाडगर(भारत)वि.वि.आदित्य गडिया(भारत)6-2, 6-1;आदित्य भावे(भारत)वि.वि.गौरव राव(भारत)7-5, 4-6, 10-7;हातिम मोड(भारत)[4]वि.वि.विकास कुकरेजा(भारत) 6-1, 6-3;नयन पानगंटी(भारत) वि.वि.सत्येंद्र कुमार(भारत) 6-1, 6-1;बालाजी परी(भारत) वि.वि.समर खान(भारत) 4-6, 6-3, 10-6;
30 वर्षांवरील महिला: उपांत्यपूर्व फेरी: आशा कार्तिकेयन(भारत) वि.वि.शैली त्रिवेदी(भारत) 6-4, 6-3;शैलजा कुमार(भारत) वि.वि.तब्बसुम शेख(भारत) 6-1, 6-1;
35 वर्षांवरील पुरुष:प्रसनजीत पॉल(भारत)वि.वि.उत्कर्ष फिरके(भारत) 6-1 ,6-2;उमाकांत कुलकर्णी(भारत)वि.वि.रोहन आजमनी(भारत) 6-2, 6-1;
40 वर्षांवरील पुरुष: पहिली फेरी:शशीधर रेड्डी पूछकायाला(भारत)वि.वि.ऋषिकेश क्षीरसागर(भारत)6-1, 6-0;भरत पॉल सिंग(भारत)वि.वि.जयनारायण केआर(भारत) 4-6, 7-5, 10-6;अनमोल शर्मा(भारत)वि.वि.राजेश अद्दाला(भारत) 6-2, 4-6, 10-7;
45 वर्षांवरील पुरुष: अपूर्व यतेंद्र(भारत) वि.वि.रवी तेज उमेथला (भारत) 6-4, 6-4;सेल्वम के(भारत) वि.वि.देवानंद महापती(भारत)6-3, 7-6(6);नरेंद्र सिंग चौधरी(भारत) वि.वि.अरिंदम देब(भारत) 6-3, 6-1;आशुतोष शर्मा(भारत) वि.वि.रजनीकांत कुलकर्णी(भारत) 6-0, 6-1;चंद्रशेखर व्ही(भारत)[4] वि.वि.मनिष पांडे(भारत) 6-2, 6-0;सुमेश नायर(भारत) वि.वि.सुदीप्ती साहू(भारत) 6-0, 6-0;संदीप बेडेकर(भारत)[3]वि.वि.वेंकटेश श्रीदेवी(भारत) 6-0, 6-2;
Post Views: 16