सोलापूर : पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत राजधानी एक्स्पोर्ट्स, एमआयडीसी, अक्कलकोट रोड, सोलापूर येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, सोलापूर यांच्या सहाय्यक आयुक्त श्रीमती संगीता खंदारे तसेच कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाचे मंत्री मा. श्री. मंगलप्रभात लोढा यांचे स्वीय सहाय्यक श्री. संतोष गायकवाड तथा विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी उपस्थितांनी पर्यावरण संरक्षणासाठी अधिकाधिक वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प केला. वृक्षारोपण ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन मयूर दरगड यांनी आपल्या मनोगतातून केले.
कार्यक्रमास डॉ. राहुल आंबले, डॉ. हर्षवर्धन जोशी, ॲड. निलेश जोशी, आरटीओ निरीक्षक संदीप शिंदे, उद्योगपती सुयश खानापुरे, अमित कवाड, गिरीकर्णिका फौंडेशन चे अध्यक्ष व सोलापूर मंच चे सदस्य विजयकुदन जाधव, सोलापूर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे नूतन अध्यक्ष कल्पेश हरकूट तसेच सोलापूर जिल्हा माहेश्वरी महिला अध्यक्षा सौ. स्मिता हरकूट, रोटरी ई – क्लब ऑफ सोलापूर इलीट चे नूतन अध्यक्ष संदीप कुलकर्णी, यांच्यासह शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन राजधानी एक्स्पोर्ट्सचे संचालक राधेश्याम दरगड यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मयूर दरगड, अध्यक्ष, रोजगार मेळावा समिती, सोलापूर तथा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग यांनी उपस्थितांचे आभार मानले.





















