वेळापूर – तांदुळवाडी ता. माळशिरस येथील ‘हनुमान हायस्कूल व ज्युनियर कॉलेज’ चा ४२ वा वर्धापन दिन विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांनी अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व वै. ह. भ. प. सुखदेव जनार्दन शिंदे यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त किसन करंडे होते.
यावेळी व्यासपीठावर सचिव ज्ञानेश्वर उघडे, उपाध्यक्ष दत्तात्रय उघडे, विश्वस्त शशिकांत कदम,बापूसाहेब काकडे, प्राचार्य देवकर सर, पर्यवेक्षक कुचेकर , निनाद पाटील,अभिजित जाधव, उदय कदम,ओंकार आडत, सतिश पारसे उपस्थित होते.
वर्धापन दिनाचे औचित्य साधून
इयत्ता १० वी आणि १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा विशेष सन्मान करण्यात आला. गतवर्षी प्रत्येक वर्गातून निवडलेल्या ‘आदर्श विद्यार्थी’ आणि ‘आदर्श वर्ग’ यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.छत्रछाया हरपलेल्या गरजू मुला-मुलींना शाळेतर्फे मोफत गणवेश व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.शाळेने गेल्या ५ वर्षांपासून लावलेल्या ५ झाडांचे यशस्वी संगोपन व संवर्धन केल्याबद्दल, ‘माळशिरस तालुका पत्रकार संघा’ कडून शाळेला ५,००० रुपये रोख आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.कामधेनू सेवा परिवाराबाबत संस्थापक डॉ. लक्ष्मणराव आसबे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निनाद पाटील म्हणाले कि,”विद्यार्थ्यांनी झाडांचे महत्त्व आणि पर्यावरण जोपासना समजून घेतली पाहिजे. आधुनिक सुखसोयींचा दैनंदिन जीवनात चांगला वापर करून, भविष्यात मोठे अधिकारी बनण्यासाठी कठोर परिश्रम करावेत.तसेच वै. ह. भ. प. आप्पांच्या जीवनचरित्रावरही प्रकाश टाकत उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साळुंखे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार प्रा. गायकवाड यांनी मानले.
फोटो ओळी
तांदुळवाडी येथील हनुमान हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या छत्रछाया हरपलेल्या विद्यार्थ्यांना कामधेनु परिवार व प्रशाला च्या वतीने मदतीचे वितरण करताना उपस्थित मान्यवर व विद्यार्थी
Post Views: 8