सोलापूर: जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार २०२६-२७ जाहीर करण्यात आले असून समाधान माध्यमिक प्रशाला दहिटणे सोलापूर चे मुध्याध्यापक मा. श्री. इरफान शौकतअली शेख यांची शहर स्तरातून आदर्श मुख्याध्यापक म्हणून निवड करण्यात आली. पुरस्कार वितरण सोहळा रविवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता संतराज पॅलेस, इसबावी, पंढरपूर येथे पार पडला.
पुणे विभाग शिक्षक आमदार मा. जयंतराव असगावकर साहेब, नियंत्रक समितीचे अध्यक्ष मा. सुभाषराव माने सर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे तथा सोलापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघांचे अध्यक्ष मा. तानाजी माने सर, आयु,महेश सरवदे सर, श्रीशैल पाटील सर, विद्यानंद स्वामी सर, रविशंकर कुंभार सर, श्रावण बिराजदार सर आदीच्यां हस्ते मुख्याध्यापक श्री. इरफान एस. शेख सरांना जिल्हास्तरीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.सदर प्रसंग अविस्मरणीय असावे या उद्देशाने त्यानी हा पुरस्कार प्रशालेतील विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मान्यवरांकडून स्वीकारला.. त्या प्रित्यर्थ संस्थेचे अध्यक्ष श्री. शौकतअली महिवृबसो शेख, सर्व शिक्षक बंधू भगिनी व विद्यार्थी विद्यार्थीनींनी कौतुक करत अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
Post Views: 12