सोलापूर – अकॅडमी मधील नृत्यांगनाच्या कला गुणांना संधी मिळावी म्हणून कलादर्शिनी अकॅडमी ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स, यांच्या चौथ्या वर्धापन दिना निमित्त ‘कृष्णार्पणम्’हा भव्य भरतनाट्यम् नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यास रसिक जणांनी भरभरून प्रतिसाद दिली
हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात कृष्णार्पणम नृत्याविष्कार कार्यक्रमाचे उद्घाटन सुनिता प्रवीण डोणगरे डॉक्टर जितेंद्र कानडे डॉ शिवकांची चिप्पा या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले त्यानंतर अकॅडमी मधील विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची विविध रूपे लीला भक्ती आणि तत्त्वज्ञानाचे कलात्मक दर्शन घडविणाऱ्या भरतनाट्यम शैली तील नृत्याविष्कार कार्यक्रम सादर केला या कार्यक्रमात 50 विद्यार्थी सहभागी झाले होते त्यास रसिक प्रेक्षकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला
अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी भरतनाट्यम् शैलीतून श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे भावपूर्ण, शिस्तबद्ध आणि देखणे सादरीकरण करून विद्यार्थ्यांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. उत्कृष्ट नृत्यरचना, भावाभिनय, नेत्रसुखद वेशभूषा, संगीत आणि प्रभावी रंगमंचीय सादरीकरण यांमुळे कार्यक्रमाने वेगळी कलात्मक उंची गाठल्याचे दिसून आले
कार्यक्रमाची संकल्पना, सूत्रसंचलन नृत्यदिग्दर्शन अकॅडमीचे संस्थापक हृषीकेश पागे यांच्या शिष्या सौ. अक्षता भंडारी विडप केले तर आभार सुनिता प्रवीण डोंगरे यांनी मानले
चौकटीतील मजकूर
कु अक्षता भंडारी यांची नेत्रदीपक कृष्णवंदना
श्री श्री रविशंकर यांचे शिष्य लक्ष्मण भंडारी यांची कन्या अक्षदा भंडारी या भरत नाट्यम नृत्यात पारंगत आहेत त्यांनी कार्यक्रमात नेत्रदीपक कृष्णवंदना नृत्य सादर केले त्यास प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली
फोटो ओळ
कला दर्शनी अकॅडमीच्या चौथ्या वर्धापन कलाविष्कार दाखविणाऱ्या नृत्यांगना
Post Views: 11