सांगोला – महाविद्यालयातील अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, हिंदी विभाग व महाराष्ट्र हिंदी परिषद, सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदी दिवस निमित्त काव्यवाचन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हिंदी विभागाचे माजी विद्यार्थी कवि गौसपाक मुलाणी यांनी कविता कशी असावी तसेच कविता करताने घ्यावयाची काळजी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी हिंदी मधून विविध विषयावर कविता सादरीकरण तसेच वक्तृत्व स्पर्धेमध्ये हिंदी भाषा व राष्ट्रीयता, वर्तमान राजकारण व आजचा तरुण, आजची शिक्षण व्यवस्था, नवीन भारत नवी दिशा या विषयावर आपले प्रभावी विचार मांडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ.प्रकाश पाटील यांनी भाषण व कविता मनुष्याला समृद्ध बनविण्यासाठी महत्वपूर्ण असतात असे प्रतिपादन केले. या स्पर्धेसाठी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक डॉ.राम पवार व प्र.प्राचार्य डॉ सुरेश भोसले यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेचे सूत्र संचालन श्रद्धा काशीद, प्रास्ताविक हिंदी विभागाचे प्रमुख प्रो.डॉ.नवनाथ शिंदे, आभार प्रदर्शन डॉ.मालोजी जगताप यांनी केले.