सोलापूर – चेष्टामस्करीत लाथाबुक्क्याने मारहाणीत जखमी झालेल्या बिहार राज्यातील एका तीस वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान येथील शासकीय रुग्णालयात आज मंगळवारी सकाळी नऊ वाजता मृत्यू झाला.
तुला कुमार (वय 30 मूळ रा. बिहार सध्या रा.लांबोटी ता.मोहोळ. कांचन हॉटेल जवळ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे. चेष्टा मस्करी करीत असताना रविवारी रात्री लांबोटी येथील कांचन हॉटेल जवळ त्याला त्याच्याच गावातील अमित कुमार याने लाथा बुक्क्याने मारहाण केली होती. त्यात तो जखमी झाला होता. त्याला मोहोळ येथे प्राथमिक उपचार करून येथील शासकीय रुग्णालयात भाऊ विहार याने गंभीर अवस्थेत सोमवारी सकाळी दाखल केले असता त्याचा उपचारादरम्यान आज मंगळवारी सकाळी मृत्यू झाला .
मयत तुला कुमार हा विवाहित असून त्याच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगा असा परिवार आहे. तो बिहार येथून काही महिन्यापूर्वी लांबोटी येथे सिमेंटच्या वस्तू तयार करणाऱ्या कारखान्यात कामाला होता. अशी माहिती नातेवाईकांनी दिली .
Post Views: 39