अकलूज – येथील श्री शिवशंकर वीज कामगार सहकारी पतसंस्था ४२ वी आणि सोलापूर जिल्हा विद्युत कामगार ग्राहक सहकारी पतसंस्था ४१ वी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच अत्यंत खेळीमेळीच्या आणि उत्साही वातावरणात पार पडली.या संयुक्त सभेच्या अध्यक्षस्थानी इंटक चे सोलापूर जिल्हाध्यक्ष डॉ.धवलसिंह मोहिते-पाटील होते.या प्रसंगी व्यासपीठावर शिवशंकर पतसंस्थेचे चेअरमन राजाराम घुगे,विद्युत कामगार ग्राहक पतसंस्थेचे चेअरमन युवराज ओहोळ,आनंदराव पाखरे,किशोर जाधव,नागनाथ पांढरे,संतोष चव्हाण,सत्यशील गायकवाड, प्रदीप सुरवसे,सिद्धाराम चव्हाण, डॉ.माधव लवटे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉ.धवलसिंह मोहिते- पाटील यांनी पतसंस्थांच्या प्रगतीचा गौरव केला.ते म्हणाले,पतसंस्थेची उत्तरोत्तर होत असलेली आर्थिक प्रगती,वाढती सभासद संख्या, सभासदांना दिला जाणारा आकर्षक लाभांश आणि संस्थेचा शिस्तबद्ध व पारदर्शक कारभार खरोखरच कौतुकास्पद आहे. संस्थांची ही यशस्वी वाटचाल म्हणजे संचालक मंडळाच्या प्रामाणिक आणि दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाचेच फळ आहे.
शिवशंकर पतसंस्थेचे चेअरमन राजाराम घुगे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडताना सांगितले की,संस्थेची वार्षिक उलाढाल सध्या १३ कोटी रुपयांच्या आसपास असून एकूण सभासद संख्या ३९९ आहे.केवळ व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता संस्था सामाजिक बांधिलकीही जपते.संस्थेच्या वतीने कन्यादान योजना राबवली जाते तसेच आषाढी वारीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अल्पोपहार आणि पाणी वाटप केले जाते.
या वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून संस्थेतील सभासदांच्या गुणवंत पाल्यांचा (विद्यार्थ्यांचा) विशेष सन्मान करण्यात आला तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचाही सत्कार करून त्यांच्या सेवेचा गौरव करण्यात आला.या सभेसाठी दोन्ही पतसंस्थांचे सर्व संचालक,सेक्रेटरी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.सभेची सांगता अत्यंत उत्साहात झाली.
Post Views: 19