सोलापूर – लायन्स इंन्टरनॅशनल अंतर्गत लायन्स क्लब ऑफ सोलापूर सिटीच्या अध्यक्षपदी लायन मोहन भूमकर यांची निवड करण्यात आली.

यावेळी सचिव, खजिनदार आणि इतर लायन्स सदस्यांची संचालक पदी निवड करण्यात आली.लायन्स क्लब मध्ये ३९ वर्षे कार्यरत आहेत तसेच सोलापूर जिल्हा तायकॉदो स्पोर्ट्स कॉन्सील १३. वर्षापासुन जिल्हा अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. तसेच विणकर बाग प्रभात मंडळ येथे सुद्धा अध्यक्ष म्हणून आहेत. गुरुविद्या प्रतिष्ठान येथे सुध्दा संस्थापक आहेत. लायन्स क्लब ऑफ सिटीच्या वतीने विविध सेवाकार्य शहरात, ग्रामीण भागात सुध्दा सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा क्षेत्रात काम करत आहे. यांच्या या निवडी बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे























