सोलापूर : बारावी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थी तसेच त्यांच्या पालकांसाठी “अभियांत्रिकी क्षेत्रामधील संधी आणि प्रवेश प्रक्रिया” या विषयावर विशेष चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शनिवार, दि. 11 जुलै 2026 रोजी सायंकाळी 5.00 वाजता निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर येथे होणार आहे.
या चर्चासत्रात ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे ‘अभियांत्रिकी शिक्षणातील विविध संधी, बदलते तंत्रज्ञान आणि करिअरच्या नव्या दिशा’ याविषयी मार्गदर्शन करणार आहेत तसेच करिअर डेव्हलपमेंट उपप्राचार्य डॉ. श्रीनिवास एस. मेतन विद्यार्थ्यांना ‘करिअर नियोजन व रोजगाराच्या विविध संधींबाबत’ सविस्तर माहिती देतील.

याशिवाय, प्रथम वर्ष विभागप्रमुख डॉ. एस. डी. जाधव हे अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रिया, केंद्रीभूत प्रवेश (CAP), आवश्यक कागदपत्रे, प्रवेशाच्या विविध फेऱ्या तसेच विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या शंकांचे निरसन करतील.
बारावी (विज्ञान) उत्तीर्ण विद्यार्थी, पालक तसेच अभियांत्रिकी शिक्षण घेण्याची इच्छा असलेल्या सर्वांनी या चर्चासत्रास आवर्जून उपस्थित राहून तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे व आपल्या प्रवेश प्रक्रियेसंबंधी सर्व शंकांचे निरसन करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे यांनी केले आहे.






















