शनिवार दिनांक, ११/७/२०२६ रोजी नू. म. वि. शिशु शाळेमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पालक सभा संपन्न झाली . मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलाने पालक सभेची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख पाहुण्या सौ अश्विनी तडवळकर, नाट्य कलाकार दैनिक तरुण भारतच्या डिजिटल प्रमुख, मा. सुरेश बाबू मंकणी, सदस्य शाळा समिती सोलापूर. शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
शाळेच्या संगीत शिक्षिका सौ अलका ओक यांनी ईशस्तवन सादर केले. मा.अर्चना कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून शाळेचे नियम आणि उपक्रमा संदर्भात माहिती दिली, त्याच बरोबर शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विषयांचे विवेचन पीपीटी द्वारे सादर केले.
सौ सायली देशमुख , इंग्रजी शिक्षिका यांनी शाळेत इंग्रजी विषय कसा शिकवला जातो याबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले.पोएम सादर केल्या.
संगीत शिक्षिका अलका ओक यांनी प्रार्थना ,भजन, अभिनय गीत यांच्या चाली पालकांना सांगितल्या.
मा.अश्विनी तडवळकर यांनी शाळेच्या कामकाजाचे कौतुक आणि पालकांनी या शाळेत विद्यार्थ्यांना घातले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आपल्या मनोगतातून केले .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सौ मृणाल देशपांडे यांनी केले.
पालक सभा यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर वृंद यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 96