सोलापूर- रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी वर्ष 2026-27 करिता अध्यक्षपदी रोटे. बसवराज बिराजदार तर सचिवपदी रोटे. संतोष सावळगी यांची निवड करण्यात आली आहे.

या नूतन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ शुक्रवार दिनांक 17 जुलै 2026 रोजी सायंकाळी ६.३० वा. संपन्न होणार आहे. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. जयेशभाई पटेल उपस्थित राहणार असून असिस्टंट गव्हर्नर रोटे. रोटे. वंदना कोपकर हे उपस्थित राहणार आहे.
रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटी हे सामाजिक, वैद्यकीय, शैक्षणिक आणि सेवाभावी उपक्रमांत सदैव अग्रेसर राहिलेले क्लब असून नव्या कार्यकारिणीतून जनहितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनिर्वाचित अध्यक्षांनी व्यक्त केला आहे.
या कार्यकारिणी संचालक मंडळामध्ये रोटे. महेश साळुंके, रोटे. अनिल चंडक, मेंबरशिप डेव्हलपमेंट संचालक रोटे. डॉ. अकबरसाहेब नदाफ, रोटे. नागेश शेंडगे, रोटे. योगीनाथ कुडते, रोटे. सत्यम दुधनकर, रोटे. मो. इक्बाल बागबान, रोटे. स्वाती मनसावाले, रोटे. डॉ. शिवगंगा मैंदर्गी, रोटे. सलीम जमादार, रोटे. विशाल कोंतंम, रोटे. समीर नदाफ, रोटे. भारत कदम यांचा समावेश आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने रोटेरियन, पाहुणे व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन रोटे. बसवराज बिराजदार यांनी केले आहे.























