मुंबई : एआय आता आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनत असून, मोबाईल उपकरणांद्वारे त्याची पूर्ण क्षमता समोर येत आहे. हा बुद्धिमान अनुभव लोकांच्या रोजच्या जगण्यात सहज आणि उपयुक्त ठरावा, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यामध्ये ‘गॅलेक्सी वॉच’ प्रगत व वैयक्तिकृत एआयच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेणारे एक महत्त्वाचे माध्यम (गेटवे) म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे.

फक्त हे नवीन गॅलेक्सी वॉच परिधान केल्याने सहजपणे उत्तम आरोग्याचा संपूर्ण नवीन स्तर अनुभवता येऊ शकतो. गॅलेक्सी वॉच बॅकग्राउंडमध्ये सतत काम करते, ज्यामुळे सर्वसमावेशक आरोग्य सेवा तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा भाग बनते. संपूर्णपणे नवीन अंतर्गत घटक आणि सुधारित बॅटरी लाईफसह हे आगामी वॉच तुमच्या आरोग्याचा अधिक काळ आणि अधिक अचूकतेने मागोवा घेण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे.
गॅलेक्सी वॉच आपल्याला नेहमीच समजून घेत आले आहे, जे आपण नेहमी उघड्या डोळ्यांनी पाहू शकत नाही, जसे आपण कशी विश्रांती घेतो, हालचाल करतो आणि झोपतो याचा मागोवा घेणे. आता बुद्धीमान आणि एआय-चालित माहितीच्या आधारे विकसित होत हे वॉच आपल्याला आपले आरोग्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास आणि प्रत्यक्ष वेळेत (रिअल टाइममध्ये) सक्रियपणे व्यवस्थापित करण्यास मदत करत आहे.
गॅलेक्सी वॉचच्या या पुढील नाविन्यपूर्ण बदलाची ओळख करून घेण्यासाठी २२ जुलै रोजी भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी ६:३० वाजता आमच्या सोबतीला गॅलेक्सी अनपॅक्ड या विशेष सोहळ्यात सामील व्हा. हे नवीन गॅलेक्सी वॉच तुम्हाला तुमच्या आरोग्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि कनेक्टेड एआय परिसंस्थेमध्ये अधिक निरोगी जीवन जगण्यास कशाप्रकारे सक्षम करते ते जाणून घ्या.





















