सोलापूर – स्कूल गेम्स फेडरेशन ऑफ इंडिया’ च्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी शालेय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचे क्रीडा प्रकारनिहाय व स्थळनिहाय अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेच्या क्रीडा महाकुंभाचे यजमानपद यंदा देशातील वेगवेगळ्या राज्यांना विभागून देण्यात आले असून, महाराष्ट्राला थलेटिक्स, बेसबॉल, कबड्डी, बास्केटबॉल, सायकलग, वॉटर पोलो आणि व्हॉलीबॉल यांसारख्या अत्यंत लोकप्रिय खेळांच्या यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे. या जाहीर झालेल्या वेळापत्रकात 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुलींच्या वयोगटांचे सामने रंगणार आहेत.

महाराष्ट्रात रंगणार ’या’ खेळांचे सामने:
ॲथलेटिक्स (14 वर्षांखालील मुले-मुली): देवरुख-डेरवण (रत्नागिरी)-
बेसबॉल (19 वर्षांखालील मुले-मुली): जळगाव
बास्केटबॉल (17 वर्षांखालील मुले): वारणानगर
सायकलग (रोड रेस – तिन्ही वयोगट): पुणे
कबड्डी (19 वर्षांखालील मुले): नांदेड
व्हॉलीबॉल (14 वर्षांखालील मुले-मुली): शिर्डी (अहिल्यानगर)
वॉटर पोलो (19 वर्षांखालील मुले): महाराष्ट्र (स्थळ निश्चिती प्रलंबित).
———-
प्रमुख क्रीडा प्रकार, वयोगट आणि आयोजन स्थळांचा तपशील असा :
ॲथलेटिक्स – 17 वर्षांखालील मुले आणि मुली – मध्य प्रदेश – शिवपुरी, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – हरियाणा – कर्नाल.
बॅडमटन – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – मध्य प्रदेश – सागर, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – उत्तर प्रदेश – बरेली, बॅडमटन – 19 वर्षांखालील मुले आणि मुली – हरियाणा – पानिपत.
बेसबॉल – 14 आणि 17 वर्षांखालील मुले व मुली – दिल्ली – दिल्ली,
बास्केटबॉल – 14 वर्षांखालील मुले – मध्य प्रदेश – गुना, 14 वर्षांखालील मुली – आय.सी.एस.ई. स्कूल कौन्सिल – कोतागिरी, 17 आणि 19 वर्षांखालील मुली – झारखंड – रांची, 17 आणि 19 वर्षांखालील मुली – पंजाब – लुधियाना, 19 वर्षांखालील मुले – छत्तीसगड – रायपूर.
बीच व्हॉलीबॉल – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – पश्चिम बंगाल – कोलकाता, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – दादरा आणि नगर हवेली आणि दमण व दीव – दमण, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – तमिळनाडू – नागपट्टिनम.
बॉक्सिंग – 14 वर्षांखालील मुले – दिल्ली – दिल्ली, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – मणिपूर – इम्फाल, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – हरियाणा – भिवानी.
बुद्धिबळ – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – मध्य प्रदेश – सिहोर, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – राजस्थान – (निश्चित होणे बाकी), 19 वर्षांखालील मुले आणि मुली – दिल्ली – दिल्ली.
क्रिकेट – 14 वर्षांखालील मुले – मध्य प्रदेश – उमरिया, 17 वर्षांखालील मुले – मध्य प्रदेश – ग्वाल्हेर, 17 वर्षांखालील मुली – जम्मू आणि काश्मीर – (निश्चित होणे बाकी), 19 वर्षांखालील मुले – मध्य प्रदेश – नरसगपूर, 19 वर्षांखालील मुली – हरियाणा – रोहतक.
सायकलग (रोड) – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – महाराष्ट्र – पुणे, सायकलग (ट्रॅक) – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – झारखंड – रांची.
डायव्हिंग – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – आसाम – (निश्चित होणे बाकी), 17 वर्षांखालील मुले आणि मुली – आसाम – (निश्चित होणे बाकी), 19 वर्षांखालील मुले आणि मुली – गोवा – पणजी.
तलवारबाजी – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – पंजाब – लुधियाना, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – जम्मू आणि काश्मीर – जम्मू.
फुटबॉल – 14 वर्षांखालील मुले – मध्य प्रदेश – उमरिया, 14 वर्षांखालील मुली आणि 17 वर्षांखालील मुली – झारखंड – रांची, 17 वर्षांखालील मुले – उत्तर प्रदेश – बलिया, 19 वर्षांखालील मुले – अंदमान आणि निकोबार – पोर्ट ब्लेअर, 19 वर्षांखालील मुली – हरियाणा – अंबाला.
गटका – 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – दिल्ली – दिल्ली.
जिम्नॅस्टिक्स – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – पश्चिम बंगाल – कोलकाता.
हँडबॉल – 14 वर्षांखालील मुले – मध्य प्रदेश – उमरिया, 14 वर्षांखालील मुली – आंध्र प्रदेश – गुंटूर, 17 वर्षांखालील मुले – गुजरात – सोमनाथ, 17 वर्षांखालील मुली – उत्तर प्रदेश – वाराणसी, 19 वर्षांखालील मुले – पंजाब – लुधियाना, 19 वर्षांखालील मुली – हिमाचल प्रदेश – घुमारवीन.
हॉकी – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – मध्य प्रदेश – मंदसौर, 17 वर्षांखालील मुले – झारखंड – रांची, 17 वर्षांखालील मुली – ओडिशा – राऊरकेला, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – पंजाब – लेीरवलरपव – लुधियाना.
जुडो – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – दिल्ली – दिल्ली, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – छत्तीसगड – रायपूर, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – राजस्थान – बिकानेर.
कबड्डी – 14 वर्षांखालील मुले – आंध्र प्रदेश – विजयवाडा, 14 वर्षांखालील मुली – हरियाणा – दादरी, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – उत्तर प्रदेश – गोरखपूर, 19 वर्षांखालील मुली – कर्नाटक – हावेरी.
कराटे – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – पंजाब – लुधियाना, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – मध्य प्रदेश – इंदूर, 19 वर्षांखालील मुले – तेलंगणा – (निश्चित होणे बाकी), कराटे – 19 वर्षांखालील मुली – पंजाब – लुधियाना.
खो-खो – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – कर्नाटक – बेंगळुरू, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – उत्तर प्रदेश – अयोध्या, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – दिल्ली – दिल्ली, 19 वर्षांखालील मुली – राजस्थान – बारमेर.
कुराश – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – उत्तर प्रदेश – सहारनपूर,
मल्लखांब – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – मध्य प्रदेश – उज्जैन.
मॉडर्न पेंटाथलॉन – 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – गोवा – पणजी.
नेटबॉल – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – आंध्र प्रदेश – नेल्लोर, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – मध्य प्रदेश – सतना, 19 वर्षांखालील मुले – पंजाब – लुधियाना.
रग्बी – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – दिल्ली – दिल्ली.
सेपाक टकरा – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – मध्य प्रदेश – रायसेन, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – राजस्थान – पाली.
शूटग – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – मध्य प्रदेश – इंदूर, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – गोवा – मांडरेम.
सॉफ्ट टेनिस – 11, 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – मध्य प्रदेश – देवास.
सॉफ्टबॉल – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – दिल्ली – दिल्ली, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – आंध्र प्रदेश – (निश्चित होणे बाकी), 19 वर्षांखालील मुले आणि मुली – चंदीगड – चंदीगड.
स्क्वॉश – 14 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – दिल्ली – दिल्ली, 17 वर्षांखालील मुले – मध्य प्रदेश – इंदूर, 17 वर्षांखालील मुली – आय.पी.एस.सी – अजमेर.
जलतरण – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – आसाम – (निश्चित होणे बाकी), 17 वर्षांखालील मुले आणि मुली – आसाम – (निश्चित होणे बाकी), 19 वर्षांखालील मुले आणि मुली – गोवा – पणजी.
टेबल टेनिस – 14 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – मध्य प्रदेश – इंदूर, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – दिल्ली – दिल्ली.
तायक्वांडो – 14 वर्षांखालील मुले – नागालँड – दिमापूर, 14 वर्षांखालील मुली – हिमाचल प्रदेश – हमीरपूर, 17 वर्षांखालील मुले आणि मुली – जम्मू आणि काश्मीर – जम्मू, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – झारखंड-रांची.
टेनिस – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – दिल्ली – दिल्ली.
थांग-ता – 14, 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – दिल्ली – दिल्ली.
व्हॉलीबॉल – 17 वर्षांखालील मुले – गुजरात – मेहसाणा, 17 वर्षांखालील मुली – राजस्थान – (निश्चित होणे बाकी), 19 वर्षांखालील मुले आणि मुली – उत्तर प्रदेश – प्रयागराज.
वेटलिफ्टिंग – 17 वर्षांखालील मुले आणि मुली – मणिपूर – इम्फाल, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – दिल्ली – दिल्ली.
कुस्ती फ्री-स्टाईल – 14 आणि 17 वर्षांखालील मुले व मुली – दिल्ली – दिल्ली, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – हरियाणा – पानिपत.
कुस्ती ग्रीको-रोमन – 17 वर्षांखालील मुले – हरियाणा – पानिपत, 19 वर्षांखालील मुले – हरियाणा – गुरुग्राम.
वुशू – 17 वर्षांखालील मुले आणि मुली – जम्मू आणि काश्मीर – श्रीनगर, 19 वर्षांखालील मुले आणि मुली – झारखंड – रांची.
योगासन – 14 वर्षांखालील मुले आणि मुली – पश्चिम बंगाल – कोलकाता, 17 वर्षांखालील मुले – आय.सी.एस.ई. कौन्सिल – (निश्चित होणे बाकी), 17 वर्षांखालील मुली – राजस्थान – (निश्चित होणे बाकी), 19 वर्षांखालील मुले आणि मुली – झारखंड – रांची.
कलरीपायट्टू – 17 आणि 19 वर्षांखालील मुले व मुली – उत्तर प्रदेश – लखनऊ.






















