करकंब – पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी,अप्पर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,पंढरपूर उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांच्या आदेशानुसार करकंब पोलीस स्टेशनचे सपोनी योगेश लंगुटे यांच्या मार्गदर्शनाखाली करकंब पोलिसांनी अवैध दारू साठ्यावर छापा टाकून १लाख १४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी कॉन्स्टेबल क्र.७१५ श्याम गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार १३ जुलै रोजी सायंकाळी मौजे नांदोरे ता.पंढरपूर येथील भीमा नदीच्या फुलापासून नांदोरेकडे जाणाऱ्या रस्त्यालगत सुमारे ४०० मीटर अंतरावर चिलारीच्या झाडाखाली अवैधरित्या साठवून ठेवण्यात आलेला दारूचा साठा आढळून आला.या कारवाईत एकूण १लाख १४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.संशयित आरोपी सागर शंकर शिंदे.रा.नांदोरे ता.पंढरपूर याने वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोव्हेशनचा माल बेकायदेशीररित्या विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या स्थितीत मिळून आला.करकंब पोलीस स्टेशनचे सपोनी योगेश लंगुटे यांच्या आदेशाने गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस सब इन्स्पेक्टर निलेश पोमणे हे करत आहेत.सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास रणदिवे,पोहेकॉ लक्ष्मण भांगे,पोहे गणेश शिंदे,पोना हनुमंत सावंत,पोकॉ श्याम गायकवाड,पोकॉ स्वप्निल बागल आदींनी ही कामगिरी केली.