करकंब – सन २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या नीट (राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा) परीक्षेत करकंब येथील डि.ए.व्ही.महात्मा आनंद स्वामी सरस्वती ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी सिद्धेश्वर धोंडीराम भाजीभाकरे याने ७५० पैकी ५११ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले.त्याच्या या यशाबद्दल स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉ.बी.पी.रोंगे यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला.यावेळी रामभाऊ जोशी हायस्कूलचे मुख्याध्यापक हेमंत कदम,पर्यवेक्षक धनवंत करळे,सिद्धेश्वर भाजीभाकरे याची माता कीर्ती भाजीभाकरे आदी उपस्थित होते.
चौकट.
सिद्धेश्वर भाजीभाकरे याची माता या रामभाऊ जोशी हायस्कूलमध्ये मध्यान्ह भोजन शिजवण्याचे काम करतात तर वडील खाजगी नोकरी करतात.अशा प्रतिकूल परिस्थितीत सिद्धेश्वरने मिळविलेले हे यश अत्यंत कौतुकास्पद असल्याची भावना डॉ.रोंगे यांनी व्यक्त केली. त्याची मेहनत,जिद्द आणि चिकाटीमुळे हे यश शक्य झाले असून इतर विद्यार्थ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरेल असेही त्यांनी नमूद केले.
सिद्धेश्वरच्या या यशाबद्दल दयानंद शिक्षण संस्थेचे स्थानिक सचिव डॉ.महेश चोप्रा,प्रशासक डॉ.विजयकुमार उबाळे,स्थानिक सल्लगार समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले.
Post Views: 15