पंढरपूर – श्री दादासाहेब सोमदळे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित विवेक वर्धिनी विद्यालय या प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर भव्यदिव्य असा दिंडी सोहळा सादर केला. या दिंडी सोहळ्याची सुरुवात प्राचार्य डॉ. यू.आर मुंढे यांचे हस्ते पालखीचे पूजन करून करण्यात आले. यावेळी पर्यवेक्षक ए.ए.पवार तसेच सांस्कृतिक विभागातील सर्व शिक्षक शिक्षिका उपस्थित होते.
ही दिंडी शहराच्या मध्यवर्ती भागातून काढण्यात आली यामध्ये समाजप्रबोधन पर भारुड ,पथनाट्य ,पर्यावरण विषयक संदेश, विविध संतांची वचने विद्यार्थ्यांनी सांगून प्रबोधन केले.यामध्ये विविध वेशभूषेतील वारकरी,संत ज्ञानेश्वर, तुकाराम व इतर संतांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, विद्यार्थिनी, विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा धारण केलेली विद्यार्थी पालखी समवेत भजन व विठू नामाचा गजर करत जात होते.यावेळी अनेक वारकऱ्यांनी व भाविकांनी या पालखीचे दर्शन घेतले हा दिंडी सोहळा अतिशय भक्तीमय वातावरणामध्ये संपन्न झाला.
या विद्यार्थ्यांनी काढलेल्या दिंडी सोहळ्याचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ.मदन क्षीरसागर ,उपाध्यक्ष प्रा.शिवाजी वाघ,सचिव ॲड .वैभव टोमके, सहसचिव अजित नडगिरे, खजिनदार सलीम वडगावकर, सुनीता मोरे, ज्येष्ठ संचालक आप्पासाहेब चोपडे,
दिलीप घाडगे, अनिरुद्ध सालविठ्ठल, विजयकुमार माळवदकर व सर्व संचालक शिक्षक, शिक्षकेतर ,कर्मचारी पालक यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.
Post Views: 18