मंगळवेढा – आषाढी शुद्ध एकादशी सोहळा निमित्त मंगळवेढा शहरात मंगळवार दिनांक 21 जुलै ते शनिवार दिनांक 26 जुलै या कालावधीत मांस, मटन, मासे विक्री, प्राणी कत्तल तसेच मांसजन्य पदार्थ विक्रीवर नगरपालिका प्रशासनाने बंदी घालण्यात यावी.
मंगळवेढा ही 14 संतांची संतभूमी आहे. मंगळवार दिनांक 21 जुलै रोजी श्री संत दामाजी पंताच्या पालखीचे मंदिरापासून मेटकरी गल्ली येथे प्रस्थान होणार आहे. तसेच बुधवार दिनांक 22 जुलै रोजी श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पालखीचे आगमन होणार आहे. त्यामुळे मंगळवेढा शहरात भक्तिमय वातावरण राहणार आहे.
यंदा आषाढी शुद्ध एकादशीचा सोहळा 25 जुलै रोजी होत असून यात्रेचा कालावधी 21 ते 26 जुलै असा आहे या काळात भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. कायदा व सुव्यवस्था तसेच धार्मिक वातावरण कायम राखण्यासाठी नगरपालिका प्रशासनाने या कालावधीत मांस, मटन विक्रीवर बंदी घालावी अशी मागणी अखिल भारतीय वारकरी मंडळातून होत आहे.
Post Views: 28