सोलापूर- छोटा हत्ती वाहनाच्या धडकेत डिव्हायडर वर बसलेले तीन वारकरी जखमी झाल्याची घटना माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे मंगळवारी सायंकाळी घडली.
बाळासाहेब न्यानोबा राऊत वय 55 वर्ष , केज ,जि बीड) ,महादेव सखाराम सागडे ( वय 60 वर्ष रा. सेतू ,जि परभणी )आणि सोनाली शांताराम गायकवाड ( वर्ष 40 वर्ष , रा . सदर ) वरील तिघे वारकरी हे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोबत दिंडीमध्ये असताना मंगळवारी सायंकाळी वेळापूर येथील दत्त मंदिर जवळ रस्त्यावरील डिव्हायडरवर बसले होते . त्यावेळी छोटा हत्ती वाहनाने या तिघांना धडक मारली . यात तिघे पायांना मार लागून जखमी झाल्याने त्यांना वेळापूर येथील आरोग्य केंद्रात प्रथमोपचार करून रुग्णवाहिकेतून येथील शासकीय रुग्णालयात रात्री पावणे अकरा वाजता दाखल करण्यात आले .