सोलापूर – मागील भांडणाचा राग मनात धरून 10 जणांनी मिळून एका इसमाला चाकू , काठी व लाथा बुक्याने मारून जखमी केल्याची घटना माढा तालुक्यातील जाखले येथे घडली .
पांडुरंग हनुमंत भोसले (वय 41 वर्ष , रा. देवडी, ता मोहोळ ) असे त्या जखमी व्यक्तीचे नाव आहे . ते 20 जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता जाखले गावात असताना मागील भांडणाच्या कारणावरून त्यांना सोमनाथ निंबोरकर , अमोल निंबोरकर , दीपक निंबोरकर ,पांडुरंग निंबोरकर ,महेश निंबोरकर ,सोन्या निंबोरकर व इतर चार जणांनी मिळून मारहाण केली . यात मार लागून जखमी झाल्याने त्यांना टेंभुर्णी येथील आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी येथील शासकीय रुग्णालयात आज बुधवारी सकाळी दहा वाजता ते स्वतः दाखल झाले .
Post Views: 6