सांगोला – पंढरपूरच्या दिशेने विठ्ठलनामाचा गजर करत पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला तालुक्यातील नाझरे मठ येथे चोपडी येथील पोपट यादव, राजू यादव, हनुमंत बाबर, अमोल बाबर, संजय पाटील यांच्या वतीने लाडू-चिवडा, डाळिंब व केळीचे तसेच अक्षय सपताळ यांच्याकडून चहा वाटप करण्यात आला. यावेळी भिकाजी बाबर, अमोल यादव, शुभम यादव, विकास यादव, सचिन खळगे, विलास बाबर, बापूराव यादव, बाळासाहेब यादव, प्रतापराव पाटील, विकास गिड्डे, विनायक जावीर, बंडू मेखले, राजू मेखले, उमाजी चव्हाण, नवनाथ खळगे, विजय बाबर, गणेश यादव, कुलदीप यादव, प्रीतम यादव उपस्थित होते. या सेवाकार्याचे वारकरी तसेच ग्रामस्थांनी कौतुक केले.