अक्कलकोट – प्रभाग क्र. ११ येथील साखर विहीर जवळ, बेडर गल्ली येथे मतदार एसआर नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी हे कॅम्प आयोजित केले आहे. माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक महेश मालक इंगळे यांनी याचे काळजीपूर्वक आयोजन केले. आपल्या दैनंदिन कामानिमित्त जे मतदार कामात व्यस्त असतात अशा मतदारांनी विशेष करून या कॅम्पमध्ये नोंदणी अर्ज भरले. या कॅम्पच्या यशस्वीतेसाठी युवा नेते प्रथमेश मालक इंगळे यांनी पुढाकार घेतला व यशस्वीपणे कॅम्प पूर्ण केले. तसेच दिनांक २१ जुलै रोजी भीम नगर अक्कलकोट येथेही या कॅम्पचे आयोजन केले होते. असंख्य मतदारांनी याचा लाभ घेतला. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके साहेब, कार्यालयीन प्रमुख व उपमुख्य अधिकारी शैलेंद्र बिराजदार साहेब, अल्लोळी साहेब, अभिषेक काकडे साहेब यांचे मार्गदर्शन लाभले. या शिबिरामध्ये बीएलओ म्हणून कार्यरत असलेले सुरवसे सर, हपाळे सर, शिंदे सर, राऊत सर, पी.एम.पाटील सर नोंदणी अर्ज भरून घेतले. या शिबिरामध्ये शेखर मीनगले, रवी मलवे, मल्लिनाथ कुर्ले, आकाश चुगीकर, दिनेश रुही, स्वामी गायकवाड, दत्तामामा मडीखांबे, पुष्कराज मडीखांबे, सचिन बनसोडे, बंटी मडीखांबे, संदीप मढीखांबे, धोंडाप्पा कुंभार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नगरसेवक अविनाश मडीखांबे, माजी नगरसेवक उत्तम गायकवाड, वंचित आघाडीचे नेते चंद्रशेखर मडीखांबे व इतर पदाधिकारी यांचेही मार्गदर्शन लाभले.