पंढरपूर – आषाढी वारीदरम्यान पंढरपूर येथे महिलेस अचानक चक्कर येऊन ती बेशुद्ध पडल्याची घटना घडली. या प्रसंगी उपस्थित असलेल्या गुड समॅरिटने स्वयंसेवकांनी प्रसंगावधान ॲपद्धारे तात्काळ आपत्कालीन माहिती पाठविल्यांने संबंधित महिलेला वेळेत वैद्यकीय मदत मिळाली.आणि तीचे प्राण वाचले असल्याची माहिती गुड समॅरिटने स्वयंसेवक दयानंद मेंशेके यांनी दिली.
सोलापूर जिल्हह्यातील दयानंद मेंशेके यांनी दुपारी १२:११ वाजता गुड समॅरिटन ॲपद्वारे आपत्कालीन सूचना पाठविली. सूचना मिळताच १०८ आपत्कालीन प्रतिसाद केंद्रांने पूळूज प्राथमिक आरोग्य केंद्रांची रुग्णवाहिका घटनास्थळी रवाना केली. रुग्णवाहिका १२:१५ वाजता बेसवरून निघाली आणि अवघ्या ११ मिनिटे ५५ सेकंदांत (१२:२९ वाजता) घटनास्थळी पोहोचली. १०८ रुग्णवाहिकेच्या वैद्यकीय पथकांने महिलेवर तातडीने प्राथमिक उपचार करून पुढील वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक सेवा उपलब्ध करून दिली.
विशेष म्हणजे, १०८ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचेपर्यत गुड समॅरिटन स्वयंसेवकांनी महिलेजवळ थांबून तिची काळजी घेतली व तिला सुरक्षितपणे १०८ वैद्यकीय पथकाच्या स्वाधीन केले. त्यांच्या तत्परतेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाला वेळेत उपचार मिळणे शक्य झाले.
आषाढी वारीच्या पूर्वतयारीदरम्यान शासनामार्फत आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणामुळे आम्हाला आपत्कालीन परिस्थितीत योग्य प्रकारे मदत करण्याचा आत्मविश्वास व कौशल्य प्राप्त झाले. संबंधित महिला बेशुद्ध पडल्याचे पाहताच मी तत्काळ ॲपद्वारे माहिती दिली. अॅप अतिशय प्रभावीपणे कार्यरत होते आणि १०८ रुग्णवाहिका अल्पावधीत घटनास्थळी पोहोचली. त्यामुळे रुग्णाला वेळेत वैद्यकीय उपचार मिळू शकले असेही गुड समॅरिटन स्वयंसेवक दयानंद मेंशेके यांनी सांगितले.
Post Views: 25