सोलापूर : मराठा समाज सेवा मंडळ संचलित, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, सोलापूर येथे श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंगळवार, दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. सांस्कृतिक विभागाच्या वतीने प्राचार्य डॉ नितीन मोटे यांच्या कल्पनेतून डोळ्याला पट्टी बांधून उडी मारून काठीच्या सहाय्याने दहीहंडी फोडण्याची स्पर्धा हा उपक्रम महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहात साजरा करण्यात आला.
दहीहंडीच्या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक दहीहंडी फोड स्पर्धा घेण्यात आली. डोळ्यांवर पट्टी बांधून उडी मारून दहीहंडी फोडण्याच्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांसोबत प्राध्यापकांनीही या उपक्रमात सहभाग घेतला. या स्पर्धेत प्रा. शंभू देव गावडे यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले.
यावेळी दहीहंडी विषयावर विविध प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्यात आल्या. योग्य उत्तरे देणाऱ्या विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. तसेच मटकी सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत योगेश लिंगमपेठ यांनी प्रथम क्रमांक, संस्कृती व्हनमाने व हर्षदा गोयल यांनी संयुक्तपणे द्वितीय क्रमांक, तर अमर शेख यांनी तृतीय क्रमांक मिळविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. युवराज सुरवसे यांनी दहीहंडी उत्सवाचा उद्देश स्पष्ट केला. दहीहंडी हा केवळ हंडी फोडण्याचा किंवा मनोरंजनाचा कार्यक्रम नसून एकता, सहकार्य, संघभावना, परस्पर विश्वास, शिस्त, नेतृत्व आणि जबाबदारीचा संदेश देणारा उत्सव आहे. ‘मी’पेक्षा ‘आपण’ महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांमध्ये एकतेची भावना निर्माण करणे आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
दहीहंडी उत्सवामुळे महाविद्यालयाच्या प्रांगणात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. विद्यार्थ्यांनी ‘गोविंदा आला रे आला!’ अशा जयघोषात उत्सवाचा आनंद घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सांस्कृतिक परंपरेचे जतन करण्यासोबतच एकता, सहकार्य, नेतृत्व, जबाबदारी, शिस्त आणि क्रीडाभावनेचा संदेश
यावेळी प्राचार्य डॉ नितीन मोटे सर यांनी शुभेच्छापर मनोगतात व्यक्त केले. विद्यार्थ्यांनी दहीहंडीचा आनंद घेताना शिस्त व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन यावेळी प्राचार्य डॉ नितीन मोटे यांनी केले .
कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती मंजुश्री पाटील यांच्या हस्ते दहीहंडी सजावट स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. तसेच अशा स्पर्धातून विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास विकसित होऊन एकाग्रते बरोबर निश्चित ध्येय गाठण्या संदर्भात सतर्कता निर्माण होते,असे प्रतिपादन प्राचार्या मंजुश्री सपाटे यांनी केले. यावेळी डॉ. अरुण सोनकांबळे, डॉ. अभिमन्यू ओहोळ, डॉ. नागेश गायकवाड, डॉ. राणी मोटे, डॉ. वाल्मीक कीर्तीकर, प्रा.अमोल वाघमोडे, प्रा. नवनाथ कुचेकर, प्रा. रणजीत लोंढे, प्रा. डॉ. वर्षाराणी शिंदे, डॉ. नवनाथ पाटोळे, प्रा. जाधव, प्रा. सुहास गायकवाड, प्रा. जोशी, प्रा. विशाल गाडेकर, प्रा. बिराजदार डॉ. काळे, डॉ. होटकर, प्रा. भुसे, प्रा. हिराचंद्र मोरे, भानुदास घंदुरे, शहाजी जाधव, महेश डेंगळे, केशव लोंढे, संतोष थिटे, संजय थिटे आदी प्राध्यापक उपस्थित होते. तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तर कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. गायकवाड एस एस, प्रा. गायकवाड एस एम, प्रा. पवार मॅडम, प्रा.शिंदे मॅडम, प्रा पवार सर ,प्रा. गरड सर,प्रा. स्वार सर,प्रा साळुंखे मॅडम ,प्रा.जगताप मॅडम प्रा. जाधव मॅडम, प्रा पांढरे सर ,प्रा. नागणे सर ,प्रा. सुरवसे, प्रा. लोंढे सर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रा. मणुरे सर यांनी सूत्रसंचालन तर संयोजन डॉ. कवीश्वर यांनी केले आभार प्रदर्शन प्रा. शंभू देव गावडे यांनी मानले.
————–
Post Views: 16