सांगोला – फॅबटेक टेक्निकल कॅम्पस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च येथील उपप्राचार्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर यांच्या संशोधनाची भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने चल जैवकोळसा निर्मिती उपकरण या अभिनव डिझाइनची अधिकृत नोंदणी मंजूर करून प्रमाणपत्र दिले. या संशोधनामध्ये त्यांना प्रा.स्वानंद कदम, प्रा.वैष्णवी देशपांडे, डॉ.वेदपाठक मोहन, प्रा.अतिश धेंडे यांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल फॅबटेक टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या अध्यक्षा नीलवर्णा रूपनर, उपाध्यक्ष भाऊसाहेब रूपनर, सचिव डॉ.अमित रूपनर, कार्यकारी संचालक दिनेश रूपनर, इस्टेट डायरेक्टर डॉ.संजय आदाटे, व्यवस्थापन प्रतिनिधी प्रा.प्राजक्ता रूपनर, प्राचार्य डाॅ.रविंद्र शेंडगे यांनी त्यांचे अभिनंदन केले. हे उपकरण शेतीतील काडीकचरा, पिकांचे अवशेष आणि जैविक पदार्थांपासून जैवकोळसा (बायोचार) तयार करण्यासाठी विकसित करण्यात आले आहे.
Post Views: 10