सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळ संचलित व्हि. जी.शिवदारे प्री- प्रायमरी स्कूल व युनिक इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी निमित्त विठ्ठलाचा पालखी सोहळा आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात विठ्ठलाच्या मूर्तीचे पूजन करून करण्यात आली . विठुराया आणि आषाढीचे महत्व शाळे मधील चिमुकल्यांनाही समजावे या उद्देशाने वेगवेगळ्या महाराष्ट्रीयन संतांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. संत मुक्ताबाई, मीराबाई ,जनाबाई ,संत ज्ञानेश्वर आणि विठ्ठल रुक्मिणी वगैरे.
शाळेतून दिंडी काढण्यात आली. शाळेच्या परिसरात विठ्ठल पूजेनंतर अभंग घेण्यात आले. ज्ञानोबा माऊलीच्या व टाळांच्या गजरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले. यात विद्यार्थ्यांनी अभंग, भजन, विठ्ठलांची गाणे नामाचा जयघोष करत रिंगण केले.
पालखीचे पूजन शाळेच्या शैक्षणिक सल्लागार सौ.अंजली तिवारी मॅडम , तसेच शाळेच्या
व्यवस्थापन समिती सदस्या डॉ. शुभदा उपासे व पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष प्रा. महादेव कांबळे सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. आषाढी एकादशीचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
या कार्यक्रमाचे कौतुक संस्थेचे अध्यक्ष मा.राजशेखर शिवदारे सर यांनी केले. हा सर्व कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा बाजपेयी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडण्यात आला. सूत्रसंचालन स्वाती विभुते व प्रस्तावना मानसी झळकिकर टीचर यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख स्वाती विभुते तसेच पर्यवेक्षिका मानसी झळकिकर व समन्वयिका गोरा उडचन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पाडण्यात आला.
Post Views: 34